गझल

जिनवाणी
------------------------------ 
30/3/2021- मंळवार
------------------------------ 
तारुण्य मीपणाचे  हरवून आज गेले
वार्धक्य या जीवाला छेदुन आज गेले

लक्षात मज आले गात्रे गलित्र झाली
अंर्तहृदयास माझ्या समजून आज गेले

वासनेत मी माझ्या बेभान हो झाले 
राग द्वेष कषायाने पिचुन हो मी गेले

 लाभली वीरवाणी  मी धन्य होऊन गेले 
मज मनाला निर्मोही ते करवून गेले

बरसली  जिनवाणी मी हरकून गेले
असक्ती सोडूनी भक्तिभावात रंगून गेले

जिनवाणी गाण्यास सरसावली 'सुरेखा'
मनमणांच्या बेड्या पार करण्या गुंगून गेले
------------------------------ 
सौ.सुरेखा कटारीया ,चिंचवड पुणे-33,
मो.नं.9822745030.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता