तू हरविले 9/4/2021 कोरोना तुझ्या येण्याने इथे आता वसंत नाही कोरोना तुझ्यामुळे भय आता संपत नाही ll 1ll कोरोना नमन करतो तुझ्या इवल्या या विषाणूला हरविलेस तू जगाच्या बॉम्ब युध्दाला अन् अणुला ll 2 ll उगाच फुलारून काय करू या स्वप्न कुंजाला विहारण्या आकाश ना ठेवले तू रे आम्हांलाll3 ll सतत स्वःतास कोंडून घेतो आता रे आम्ही आजवरी असला रोग पाहिला का हो तुम्ही? Il 4 l lगांजतो प्रत्येकाच्या हृदयाशी अन् फुफुसांशी वेंटीलेटर वीना हा जीव तडफडून जाशी ll 5 ll कोरोना तू.. सोडून आताच लवकर जाई बंदीस्त जगणे असले आम्हास पसंत नाही ll6 ll सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे.33.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!