Skip to main content
मनभंग दि.11/4/2021--------------------------तुला पाहता तन झाले गुलाब,मन माझे भासे गुलकंद रे तुझ्या नजरेने दिवानी झाली होते, तू मनास ओळखले नव्हते रेll1ll माझ्याच साठी फक्त आता, माझे गुणगुणने उरले होते बऱ्याचवेळा मला सोडून, तुझे बर्याच जणिंणशी जुळले होते रे ll2ll समजायचे ते उमजून राहणे, येता-जाता मला पाहणे प्राण कधीचा पणास लावून, चोरून मज टिपले होते रे ll3ll नजरे मधला डाव तुझा तो, कधी मज ही कळला नाही तुझ्या मनाच्या तऱ्हा निराळ्या ,भाव मनीचे तू थोपवले होते रे ll4ll तूच मज दावला प्रेमरंग तो,तुझ्या रंगाला भाळले होते रे अंतरंगात कसा झाला प्रेमभंग मज कळले नाही रे ll5ll डॉ.श्वेता निलेश राठोड. चिंचवड पुणे