आजचे चिंतन दिनांक 17 5 2025 आभाळा एवढं मन इंगळे सर नमस्कार, आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन...!जीवनात आपल्या मुलांचा विवाह होऊन दोनाचे चार होणे आणि एक महत्त्वाच्या जबाबदारीतून स्वतःला पार पाडत असताना आपलं संवेदनाक्षम मन तसेच सर्वांना सहकार्य करण्याची वृत्ती व कला कलात्मकतेन जोपासलेली माणसं या भारतीय जैन संघटनेमध्ये फार मोलाची,फार महत्त्वाची...! राहुल इंगळे सर ,आपण त्याच पठडीत कार्य करत आहात.आम्हा याचा मनोमन आनंद होतो. याचीच फलश्रुती की काय...!सुंदर असा चिरंजीव सिद्धार्थ व ऋतुजा यांचा शुभविवाह, खूप उत्साहात,आनंदात पार पडला आणि त्यामध्ये आम्हास आशीर्वाद देताना आनंद झाला .भारतीय जैन संघटनेचा आजी व माजी स्टाफ हा आपल्या प्रेमळ निमंत्रणाला मान देऊन आनंदात सहभागी झाला. सर हे असं घडत नसतं त्यासाठी क्षणभर आवडणारं नातं आयुष्यभर जपायला आभाळा एवढं मोठं मन असावं लागतं..!! ते मन तुमच्याकडे आहे.सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन व आपला स्वतःचा पुरुषार्थ आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते. याचा अनुभव बीजीएस मध्ये काम करणाऱ्या सेवा देणाऱ्याला आलेला आहे....