कर्म

*या जगात आपले स्वतःचे असे काहीचं नाही. जे काही तुमचे आहे, तुमच्या जवळ आहे ती निसर्गाने दिलेली तात्पुरती ठेव आहे. पुत्र सूनेची ठेव आहे,कन्या जावयाची ठेव आहे, जीवन मृत्यूची ठेव आहे आणि शरीर स्मशानाची ठेव आहे* .
*एक दिवस तुम्हाला दिसेल की मुलाच्या लग्नानंतर मुलगा सूनेचा होईल, मुलगी दुसऱ्याच्या घरची सून बनून जाईल, केव्हाही जीवन मृत्यूला शरण जाईल आणि नंतर शरीर स्मशानाच्या राखेत मिसळेल* .
*जीवनाचा सर्वात मोठा गुरु हा 'काळ' असतो. कारण 'काळ' जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा 'ठेव' ही 'ठेव' म्हणूनच सांभाळा. तिच्यावर 'मालकी हक्क' गाजवू नका. तुम्ही कितीही हुशार असलात तरी जर तुम्हाला समाजात कसे रहावे, माणसांशी कसे वागावे हे माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही* .
*'समाधान' म्हणजे एक प्रकारचे 'वैभव' असुन, ते तुमच्या अंतःकरणाची 'संपत्ती' आहे..*
*ज्याला ही संपत्ती सापडते तो 'खरा सुखी' होतो..*
*दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही,*
*आणि वाटून खाणारा कधीचं, उपाशी मरत नाही.*
*"कर्मयोगाचा सिध्दांत" दंडवत प्रणाम*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!