जगण्यावर शतदा प्रेम करावे**भावपूर्ण सुमनांजली*

*या जगण्यावर शतदा प्रेम करावे*
*भावपूर्ण सुमनांजली*
🙏
आदरणीय प्रवीणभैय्याजी, 
सुरेखा  प्रकाशजी कटारियाचा सादर जय जिनेन्द्र..! 

*आदरणीय प्रवीणभैय्या, सुनीलभैया, मा. सरपंच पुष्पा भाभी, सर्वनातू, नात सुना, मुली,जावई व सर्व परिवार *सन्माननीय माणिकचंजी अर्थात आमचे लाडके मामासा या जगात नाहीत.हे विरहाचे दुःख सहन करण्याची ताकद आपणा सर्वांना  मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!कारण त्यांचं जीवन म्हणजे परोपकाराने ओतप्रोत भरलेलं कष्टाच्या शाईने लिहिलेली पाने आयुष्यात कधीच कोरी राहत नाहीत. याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे  माणिकचंदजी ओस्तवाल ...!*
  त्यांच्या जीवनाकडे कटाक्ष टाकता अनेक गोष्टी अनेक जगण्याची तत्वे या पुढच्या पिढीला दीप स्तंभासारखे मार्गदर्शन  करतील. त्यातील त्यांची काही मी निरीक्षण केलेली जगण्याची तत्वे
*स्वतःला मर्यादित ठेवलं तरच लोक मर्यादा सांभाळून वागतात.कोणालाही उलट उत्तर द्यायला अजिबात अक्कल लागत नाही;पण कुठे शांत राहायचं आणि कुठे समोरच्याला समजावून सांगायचं  याला मात्र संस्कारच लागतो*. 
       *जितका वेळ पैसा, संस्कृती,संस्कार कमावण्यासाठी, टिकवण्यासाठी दिला  तितकाच वेळ मामासांंनी हे सार जतन करण्यासाठी दिला*
.कारण कमवलेलं टिकवणं महत्त्वाचं हे मामासानी टिकून ठेवलं, म्हणूनच आज एवढा संस्कारक्षम परिवार कारेगाव सारख्या छोट्या गावात राहून आकाशाला हात पोहोचले; तरी सुद्धा जमिनीवर पाय रोवून सारा परिवार उभा आहे. 
        *1942 च्या चले जावच्या चळवळीमध्ये मामा सानी तुरुंगवास भोगला होता,म्हणजे राष्ट्र स्वातंत्र्यासाठी सुद्धा त्यांचं काम खूप महत्त्वाचं...!हे स्वातंत्र्यसैनिक आपल्या विचारात म्हणतात, त्रास असताना ही प्रामाणिक असणं, संपत्ती असूनही साधं राहणं,अधिकार असूनही नम्र राहणं आणि राग  येत असूनही ही शांत राहणं... ही जगण्याची मॅनेजमेंट मामांजीनी आपल्या जीवनात केली* म्हणूनच साऱ्या ओस्तवाल परिवारात नव्हे तर  सर्वांना  त्यांचे जीवन म्हणजे दीपस्तंभासारखं मार्गदर्शन  करत आहे. करत राहील. 
*माझे सासरे बंकटशेठ कटारिया व माणिकचंदजी ओस्तवाल* यांची अतूट अशी मैत्री होती.नात्याने तर ते बांधलेले होतेच;परंतु मैत्रीच्या धाग्याने त्यांना अधिक एकमेकांना दृढ केलेलं होतं. 
*मला आठवते आम्हा उभयतांना  विवाह बंधनात बांधण्याचं  सत्कर्म मामासांच्या शुभहस्ते झालेलं आहे. म्हणूनच की काय त्यांनी दिलेला संस्काराचा वसा पुढे चालवण्याची क्षमता त्यांच्या आशीर्वादाने आम्हास प्राप्त होत आहे. जेव्हा जेव्हा मी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स वर राष्ट्रीय उपाध्यक्ष पंचम झोन अध्यक्ष यावर बिनविरोध निवड झाली असताना त्यांनी केलेलं माझं कौतुक परिवारानं दिलेली माझ्यासाठी ती एक शाब्बासकीची थाप होती* 
         मामासांच्या जीवनात अनेक संकटे, दुःख आले. ही शस्त्रे आहेत. ते मला म्हणायचे बिन्नी ही शस्त्रे जखमा तर देतातच, पण त्याचप्रमाणे जगण्याचं खरं शहाणपण शिकवून जातात...!
    त्यांच्या सहा ही मुली आणि दोन्ही मुले,सुना गावाची, समाजाची, साधुसंतांची निस्पृहवृत्तीने सेवा करतात. हा मोठा संस्कार * मामासांनी  व माता त्रिशला पुरस्कारानं * श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली व स्वानंद महिला संस्था या संस्थेने *स्वानंद सन्मानित झालेल्या  स्वर्गीय राजकुमार बाई मामींसानी आपल्या कृतीतून पेरला आहे.* 
*आमच्या सासूबाई सज्जनबाई कटारियांवर  त्यांचे बंधू माणिकचंदजीचा खूप जीव होता.* रांजणगावला  आल्यानंतर कन्या मंगलबाई कडे जाण्या अगोदर बहिणीची गाठ घेतल्याशिवाय कधीच जात नसे. राखी पौर्णिमेला हमखास येऊन मामासा बाईच्या हातून राखी बांधून घेत असत. 
आपल्या सुनबाईंना अर्थात *पुष्पा बिन्नीला गावच्या सरपंच पदासाठी अनुमती देऊन,गावकऱ्यांची सेवा करण्यास, आपला आगळावेगळा ठसा उमटवून साऱ्या पंचकृषीला  प्रेमा पाशात बांधणाऱ्या  स्नुषा हे  माणिकचंदजींच्या संस्काराचेच वैभव आहे . आपल्या सहा ही मुली, जावई खरोखरच समाजाची सेवा करत आहे. रांजणगावला दिलेल्या छोट्या वयात लग्न झालेल्या मंगलबाई संतोषलालजी कर्नावट एवढ्या मोठ्या परिवाराचा सांभार सांभाळत आहे. हे आपलेच संस्कार...! 
        शरीर एकदाच जन्म घेते  मामासा आपण दिलेले विचाराचे संस्कार आणि त्याचे संस्करण व मात्र दररोज जन्म घेतील.. 
       चांगल्या माणसा सोबतचं नातं म्हणजे ते उसासारखं असतं. त्याचा कसाही उपयोग करा तो ऊस गोडच लागतो. 
मामासा  तुम्ही जेव्हा जेव्हा भेटलात, तेव्हा तेव्हा अस्तेन केलेली आमची चौकशी आणि  सतत केलेलं कौतुक आमच्या चिरस्मरणात राहील,तो म्हणजे तुम्ही  नेहमी सांगायचा, *बिन्नी लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकविते. कधीही निराश होऊ नका.*
*आयुष्यात नेहमी सांभाळून चला. कौतुक केलं तर हुरळून जाऊ नका आणि नाव ठेवली तर गळून जाऊ नका.*
प्रवीणजी, सुनीलजी ,
मामासा या जगात नाहीत. हा निरोप मिळाला. निरोप मिळताच डोळे  डब डब भरून आले. तेव्हा वाटलं माझ्या मनातील  श्रद्धा भाव प्रार्थना ओठावर येण्याआधीच मामासां सारख्या  भगवंता चरणी पोहोचली. आपल्या चरणी लीन असणारी
आपली, 
स्नुषा, शिष्या 
प्राध्यापिका सुरेखा प्रकाशजी कटारिया. रांजणगाव गणपती

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता