कविता- विषय गोपाळकाला*
काव्यबहर साहित्य मंच भंडारा
शनिवार दि १६ ऑगस्ट२०२५
उपक्रम क्रं९८९
*विषय गोपाळकाला*
जन्माष्टमीच्या तिथीला
कारागृह आनंदला
तारणहार येताना
धरावर हर्ष झाला.. १
नंदलाला यशोदेचा
खोडपत्री असे कान्हा
खोड्या करतसे फार
माठ फोडी करे गुन्हा..२
बाललीला अलौकिक
बासरी यमुना तीरी
गोपी राधा होई अधीर
कधी घरी कधी दारी..३
जन्माष्टमीच्या दुसऱ्या
दिनी गोपालांचा काला
मनोरा तो उंच रचून
दहीहंडी फोडण्याला.. ४
दहीहंडी खेळ रंगला
रासदांडिया ने सजला
कृष्ण घास तो भरवी
मनी स्वर्गसुखावला.. ५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे