अष्टाक्षरी *विषय - खळखळणारा धबधबा*

*काव्यबहर साहित्य मंच आयोजित निसर्ग काव्य उपक्रम क्र.९७५ दि.२/८/२५ शनिवार*
 अष्टाक्षरी
 *विषय - खळखळणारा धबधबा* 
धबधबा निसर्गाची
सुंदरच कलाकृती
उंचावरून वाहतो
रौद्रावतार विकृती.. १

करंगळी एवढ्याच 
धारेचा बनतो छान 
बाल्यवस्था धबधबा
क्रीडाचे ठेवतो भाण.. २

कोसळतो धबधबा
रूप घेतो सरितेचे
तारुण्यात येई नदी
व्रत तिचे ते देण्याचे.. ३

प्रथम तो धबधबा
मग ती सरिता होई
जीवा समृद्ध बनवी
सारं फुलवीत जाई.. ४

ओढ सदा मिलनाची
सागरी विलीन होई
तेव्हा ती ना सरस्वती 
गंगा ना यमुना राही..५

पुन्हा होऊनीया ढग
धबधबे गिरीतून 
ज्याने दिले त्यास देण्या
घ्यावे व्रत मनातून.. ६

देई जीवना उभारी
रेखाटे चित्र सुंदर
जनातून ते पाझरे
जीव  बने कलंदर..७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड