विरह कविता
विरह
मनाची रेशीम गाठ बांधुणी गुंतती
विरहाणे कुंठित होते माझी मती
तुझ्या विना नाही शोभा जगाती
जगण्याला नाही कोणतीच गती
तुझ्या गोड हसण्याचा जणू सुगंध
माझ्या जगण्याभोवती दरवळावा
रंगलेल्या मेहंदीचा लालरंगचा गंध
त्या गंधितस्वप्नी जीव माझा भाळावा
कान आतुरले माझे बोल ऐकण्या
सखे गं सर्व सोडून येशी मजपाशी
करतो डोळ्याचे कॅमेरे तुझं पाहण्या
सहजीवन अपुले प्रफुल्ल करीशी
माझे ओठ आतुरलेत सखे तुला
भेटुनी,प्रेमाचे बोल बोलण्यासाठी
तुझ्या सहवासाचे क्षण सांगे मला
लावूयात प्रेमपणती तेवण्यासाठी
तुझे माझे तन मन समर्पण अर्पण
मीपणा सोडून मनाचे करू दर्पण
चंदन काया जिझवूनी विश्वासाने
अतुरलो आहे तुझ्या समर्पणाशी
प्रा.सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.