कविता विषय.. संवाद संपला आहे
काव्यबहर साहित्य मंच, भंडारा आयोजित उपक्रम दि.१५/७/२०२५
विषय.. संवाद संपला आहे
साद- संवाद संपत आहे ना या जगात
पैशानं सदा सुखाचा होत आहे अभास
माणूस मिथ्या सोनं सत्यच्या या युगात
जगी चाले हा संवाद संपण्याचा प्रवास
१
संवाद-सुसंवाद प्रेम आपुलकी माया
वात्सल्य श्रद्धा यातून काय मिळणार?
कुठे हरवली ती प्रेम वात्सल्यची छाया
संपलेला संवाद वयोवृद्धना छळणार?२
त्याच्यातील अनंत शक्यता बंद होऊन
संवादाची उर्जा जर एकच मार्गी जाते
तर उर्मीच लयबद्ध विरेचन बंद होऊन
घुसमट,विकृती सदा प्रकट होत जाते
३
संवादाची गरज का आहे माणसाला
याचा शोध या निमित्ताने हवा व्हायला
अदृश्य मन आहे प्रत्येक मानवाला
संवाद हवा नवनिर्मित ऊर्जा ध्यायला
४
नीट बोलू दिल नाही,तर तो किंचाळेल
तो गायला नाही,बेसूर कन्हत राहील
नीट वाचू दिल नाही,तर पाय घसरेल
मानव उर्मीचं लयबद्ध विरेचन होईल?
५
अभ्रक गर्भात आलं की फुलत राहत
आईच मन फुलणाऱ्याशी बोलत राहत
आईच्या अन्नरसानं भरण होत राहत
आईचं मन बाळपोसण्या संवाद करत
६
विचार सागर,सरिता हे आहे जीवन
उदकांचे लोंढे स्वमध्ये सामावत आहे
संवेदनाचं अखंड स्पंदन असते जीवन
संवाद हा आनंदबोध,सौंदर्य शोध आहे
७
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे.