शीर्षक-संकल्प वाढदिनी झाड* कविता

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित चित्रा आधारित काव्य लेखन उपक्रम*
२/७/२०२५.
*शीर्षक-संकल्प वाढदिनी झाड*

बाई म्हणत मुक्या झाडांची भाषा
मुलांनो मी शब्दात फुलवते अशी आनंदाने झाडे लावा झाडे जगवा
पर्यावरणाचे महत्त्व सांगे मुलांशी

कधीकधी पाऊस कधीमधी ऊन
मुलांनो निसर्गाचे फेडण्यास ऋण
झाडे लावण्याचा  घेऊयात वसा
शुद्ध हवा मिळे आईचा पदर जसा

सदा समजवत पर्यावरणच महत्त्व
कसब शिक्षकाच प्रगल्भतेच सत्व
श्रमदानी मुलांमध्ये फुललेसप्तरंग
निसर्गाने रोमांचित झाले अंगअंग

सोनू मोनू बंटी वाढदिवस मुलांचा
 गुलाब मोगरा त्यांच्या आवडीचा    संकल्प एकतरी झाड लावण्याचा
आनंद होतो वाढदिवस करण्याचा

   प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड