बाबाची साधना*
कवितेचे नाव-
*बाबाची साधना*
बाबा डोलदार तुमचा रांगडा देह
जणू वाटे हा देह वाडा चिरेबंदी
दुःख जणांचे प्राण्यांचे पाहताना
वैयावच्चसेवेची तुम्हा सदा धुंदी
बाबा साधनेच्या आठवणींचे दिवस
तना मना आठवतं साठवत जातो
कुष्ठरोग्यांना तुमच्या प्रीतीचे तराने
साधनेच्या साधने ने ऐकवत जातो
बाबा सदा तुमचे रापलेले ते हात
प्रत्येकाच्या हृदयी अन् ध्यानीमनी
थक्क करते कार्यकर्तृत्वाची गाथा
हर्ष वसे सर्व कुष्ठरोग्यांच्या लोचनी
प्राणीमात्रावर दयेचा बरसला पाऊस
मानवतेचा मोर पिसारा नाचत फुलला
ग्रासलेल्या तनास आनंदवनात दिसला
आमटेंच्या वर्तुळात जीव हा विसावला
प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड- पुणे , 33