विषय: छत्रपती शाहू महाराज
ArLiEn KA अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित उपक्रम
उपक्रम क्रमांक:१०
विषय: छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शिवाजी राजांच्या पावलावर ठेवून पाऊल
करत असे राजनीति असे होते आपुले शाहू छत्रपती
लोक गातात गावोगावी त्यांची आज ही आरती
त्यांनी आवाज देताच घराघरातून लष्करात होते भरती... 1
शूद्रांना अस्पृश्यांना स्त्रियांना दिला शाहू छत्रपतींनी मान
विषम समाज व्यवस्था ओरखडून सतत वाढविला सन्मान
समाज व्यवस्थेच्या विकासाचं प्रगतीचं ठेवलं सतत भान
त्यामुळे आजही सारा समाज करतो त्यांचे गुणगान... 2
राजर्षी महाराज शाहू छत्रपती
सार जगात तुमची महती...
तुमच्या अथांग कार्यकर्तृत्वाचं करता येणार नाही मोजमाप
दीनदयाळुंचे आपण आईबाप
अस्पृश्यता मोडून काढीली साफ...3
प्रा. सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे 33.