विषय -- विरहदिनांक -२७/६/२०२५.

विषय -- विरह
दिनांक -२७/६/२०२५.

कुठे गेलास सख्या तू
तुझ्या भेटीसाठी तरसते
रात्र रात्र वाट पाहत जागते
पौर्णिमा दिनी अमावस्या भासते

कुठे गेला सख्या तू
तुझे नाव माझ्या ओठी
जन्म जन्माच्या  बांधून गाठी
नयन तरसले तुज पाहण्यासाठी

कुठे गेलास सख्या तू
मज आठवतात क्षण सारे 
सदा तुझ्या भेटीत भांडणाचे वारे
मी म्हटलं अरे..!तू म्हणायचा का रे..! 

कुठे गेलास सख्या तू
प्रेमभाव मनातले सांगायचे 
शहाळ्यातील पाणी एकत्र प्यायचे
सागर सरितेच्या मिलनी घट्ट भेटायचे

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता