चिंतन -खबरदारीपेक्षा जबाबदारी
. *खबरदारीने वागण्यापेक्षा जबाबदारीने वागायला शिका...!* *कारण खबरदारी तुमच्या पर्यंतच मर्यादित राहते जी तुम्हाला तुमच्या पुरताच विचार करायला शिकवते, परंतु जबाबदारीची व्याप्ती फार मोठी असते...!* *ती तुमच्याबरोबर तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक जवळच्या माणसाविषयी विचार करायला शिकवते.!!*
. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही.. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला ही पर्याय नाही.
. लोकांकडून कसलीही अपेक्षा करणे सोडून द्या... कारण आता लोक मनानुसार नाही तर गरजेनुसार वागतात.!!
. *नात्याला खोट्याची वाळवी लागली की नात्याचा पाया हळूहळू खचायला लागतो.*
. अपेक्षा अशी असावी की ध्येयापर्यंत नेईल..
ध्येय असे असावे की जे जीवन जगायला शिकवेल..
जगणं असं असावं की जिथे नात्याची कदर होईल...
आणि नाती असी असावीत जी दररोज आठवण काढण्यास भाग पाडतील...!!
. नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो. तरीही अनेक वळणे घेत घेत नदी समुद्राला मिळते... तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते.. त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो.. तोच यशस्वी होऊ शकतो.
. ज्या मनाला आनंदी होण्यासाठी कुठल्याच सुखाचा आधार लागत नाही.. त्या मनाचा आनंद कुठल्याच दुःखामुळे कमी होत नाही.
. *माणसानं नेहमी तयारीतच असावं.. कारण वातावरण आणि माणूस कधी बदलेल सांगता येत नाही.*
. *आईसारखी माया आणि वडिलासारखी छाया या जगात कुठेच मिळत नाही.*.
. नेहमी मस्त रहा, आनंदी राहा.. आजचा दिवस आपला आनंदात जावो