रंजना लोढा पिकलीया सुखाचा परिमळ
*पिकल्या सुखाचा परिमळु*
रंजनाताई सुरेखा कटारियाचा नमस्कार... 🙏
स्वानंद ते परमानंद जीवन प्रवास आत्मचरित्रात्मक पुस्तक कालच वाचले आणि हाती लेखणी घेतली. आपण शब्दबद्ध केलेल्या जीवन प्रवासातील माझ्या भावना मी व्यक्त करत आहे.
स्वानंद त्याची निर्मिती त्याची साहित्य सेवा आणि प्रत्येक स्त्रीच्या मनाचा ठाव घेण्यासाठी स्वानंद करत असलेले कार्य आणि त्यातूनच सुंदर असा एक *जीवन प्रवास स्वानंद ते परमानंद या पुस्तकातून उलगडत गेला*.
आपला जीवन प्रवास शब्दबद्ध करत असताना जीवनातील चढ-उतार हे प्रवाहित नदीप्रमाणे आपण सहजतेने पार करत आज आपण वयाची सत्तरी गाठली.आपण म्हणता दिवस कसे निघून गेले आणि मी समृद्ध आयुष्य जगले. हे वाक्य ऐकलं आणि मोगऱ्यांनी भरलेल्या ओंजळीची आठवण झाली.
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला,शरीराला प्रसन्न करून जातो. पण त्या मोगऱ्याच्या वेली ना सोसलेले उन्हाळे पावसाळे आणि त्यातूनही जगाला सुगंध देण्याची उर्मी आम्हाला दिसते.
स्वानंद च्या माध्यमातून आपण आमच्या सहवासात आलेल्या..*! काही माणस त्यांच्या सौंदर्याने आवडतात तर काही त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाने ...!त्यातीलच आपण एक आहात. म्हणूनच आपण सर्व स्वानंद सख्यांच्या आवडत्या झालात.*
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीचं समोरच्याच्या मनात उतरून बघावं.शोध घेऊन तिथं माणूसपण शोधण्याचा आपण प्रयत्न केला.
शरीराची सुंदरता वया बरोबर संपते,तर मनाची सुंदरता ती वयाबरोबर अधिकच सुंदर होत जाते .शरीराला वय असतं,मनाला ते कधीच नसतं.शेवटी काय... आम्ही आपल्या स्वभावाच्या प्रेमात व स्वतः जगताना दुसऱ्यांना जगण्याची उभारी देणाऱ्या हाताच्या प्रेमात..!
*माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता,प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर,त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते.*
म्हणूनच बाहेर लक्ष लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो.
*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं.* हे माझं जगण्याचं तत्व त्या तत्त्वात आपण बसत आहात. आपणास वंदन...!
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं,ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई.ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेचं असं नाही. परंतु ती माझ्या वाट्याला नेहमीच आलेली..!
*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?नशिबानं कधी भेटलीचं तर हळुवार जतन करून ठेवावीत, कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील?* परंतु आहे ती माणसं जतन करावी.हा फार मोलाचा संदेश आपण स्वानंद ते परमानंद एक जीवन प्रवास इतरांना देत आहे.
कवडसा कवडसा मधूनच स्व आनंदाचा अर्थ दाखवणारी वाट आणि त्या वाटेवर येणार आनंदाचे स्वानंद हे तारुण्यात भर घालून जगायला शिकवणार तुझं कार्य कर्तुत्व .
तुझ्या वेड्या भाबड्या, सरल व जिद्दी मनाला गार वाऱ्याच्या झुळकिन दिशा देणारं चांदणं आपल्या आयुष्यात आपण मिळवलं.ते फुलवण्याचं काम डॉक्टर कांतीलालजी यांच्या सहजीवनाने साध्य झालं.
आपले सहजीवनसाथी डॉक्टर कांतीलालजी तसेच मुलगा डॉक्टर सुजय, सुनबाई, कन्या सोनाली-जावई, नातू,नाती आणि सारा परिवार बरोबर घेऊन चालत असताना सासरचा लोढा परिवार व माहेरचा गोठी परिवार या दोन्ही परिवाराबरोबर स्वानंदचा मोठा परिवार आपण बरोबर घेऊन चालत आहात.
आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन *खरंतर आपला स्वतःचा जीवन प्रवास स्वानंद मधील प्रत्येकीने लिहायलाच हवा. अक्षय असणाऱ्या शब्दांनी आपल्या जीवनाचा प्रवास लिहून पुढील पिढीसाठी ही शिदोरी संचित करून ठेवायला हवी*.
*आपल्या वयाचे पापुद्रे अलगद वाऱ्यावर सोडून; जणू कात टाकून नवा जन्म जगण्यासाठी धडपडणारी मनाची सतार झनकारून प्रतिकुलतेत वाट काढणारी रंजना तू... तुला सलाम!*
पुनश्च आपणास आपण शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे व आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन...!
तुझीच सखी.
प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया
मा.उपप्राचार्य भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड पुणे ते 33.
मोबाईल नंबर 9822745030