चिंतन-अध्यात्मिक पर्वाचे*1/10/2024.

*चिंतन-अध्यात्मिक पर्वाचे*
1/10/2024.

पर्युषण पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹
 स्वाध्याय प्रेमी सुरेखा कटारिया व सुनिता बोरा  इनका 🙏जय जिनेन्द्र
कृष्ण आपल्या पाठीशी हवा...
तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही...
प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुनावरही केले...
राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याना होती.. आणि 
युद्धात अर्जुन जिंकला तरी आपला काहीही फायदा होणार नाही. ही पण जाणीव  कृष्णाला होती...
पण हे असूनही त्याने ही दोन्हीही नाती अतिशय समरस होऊन निभावली..!! हे कशामुळे तर समर्पणामुळे दुधात साखर घालावी तस विरघळून आपलं अस्तित्व दूधमय करणारी साखर त्या दुधाची गोडी वाढवते त्याप्रमाणे  राधेच्या जीवनात, अर्जुनाच्या जीवनात घडलेलं आपण पाहतो. 
. आपल्याला जीवनात काय करायचे आहे हे रामायणातून  आपण शिकतो... आणि आपण जीवनात काय करु नये.. ही गोष्ट महाभारत आपणास शिकवते.
आणि जीवन कसे जगावे हे भगवान महावीरांनी दिलेली देशना  उत्तराध्ययन सूत्रामधून शिकायला हवं!! उद्यापासून  पर्युषण महापर्व सुरू होत आहे. 
सुखाच्या व्याख्या भरपूर पण प्राप्त झालेल्या आनंदात समाधान मानने म्हणजेच खरे सुख आहे. हे सांगत हे अध्यात्मिक पर्व. ..! 
सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही... त्याकरिता नेहमी  समाधानी रहावे. हाच एक रस्ता आहे.
जिनवाणी सांगते *हक्क पण तिथेच दाखवायचा जिथे आपल्या *शब्दांना* आणि *भावनांना* *किंमत असते. 
. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर परकं कोणीच नसतं..!!*
. जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कोणी तुपाशी तर कोणी उपाशी हा तर नियतीचा डाव आहे.. या डावातला वरचा आध्यात्मिक बाज म्हणजे तपस्या आहे. 
लढला तो जगला हरला तो संपला..  समभावाने जगणे इथेच तर जगण्याला भाव आहे..!!
. जोपर्यंत  जग काय म्हणेल याचा विचार करीतो तोपर्यंत  स्वतःच ध्येय कधीच प्राप्त करू शकणार नाही. चला ध्येयप्राप्तीसाठी
. *वाया गेलेला वेळ वाया गेलेल्या पैशापेक्षाही भरून न निघणाऱ्या नुसकानी सारखा आहे.*!!
. स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य अंतगड सूत्रातील एक एक मोक्षगामी मध्ये आहे ते  त्यांच्या जगण्यातून आपणास सांगत आहे. 
आपण ज्यांना भेटू तेव्हा एक स्माईल देऊन बोलायला विसरायचं नाही बरं. चूक झाल्यावर माफ करा पण आपल्या मैत्रीची जाणीव कमी करू नका. हा विश्व मैत्रीचा,  क्षमापनाचा संदेश घेऊन हे अध्यात्मिक पर्व आले आहे. 
. *36 गुणाचं काय करायचं.. जोडीदारामध्ये चार गुण असले तरी खूप झाले... निर्मळ मन, चांगलं बोलणं, चांगलं वागणं आणि इमानदारी.!!*
. जीवनात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी, त्याच्यामागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो. 
आपल्यासाठी मेहनत करून आणि घाम गाळून मिळवलेलं जे असेल तेच फक्त पवित्र आहे मग ते अन्न असो वा पैसा..!! या आध्यात्मिक परवा मध्ये सम्यक्य ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रवाहित हो, हीच तीर्थंकर चरणी प्रार्थना🌹🙏🙏🙏🌹

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड