श्रीपाल सबनीस लेख पिकल्या सुखाचा परिमळ

*साठवणीच्या आठवणीतील   - साहित्यप्रेमी बंधू डॉ.सबनीस
*पिकलिया सुखाचा परिमळु*

अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाच्या अनुषंगाने आपले विचार, आपले निरीक्षण, आपलं परीक्षण ऐकण्याची व ऐकून ते जाणण्याची पर्वणी घुंगटात असणाऱ्या आम्हा महिलांना मिळाली.आणि विचारांना चिंतनाचे धुमारेच फुटले. या अनेक धुमाऱ्यातील चिंतनाने मंथनाने निघालेली माणूस म्हणून जपणारी यथार्थ जीवनपद्धती आम्हास  बरंच काही सांगून गेली. आपण लेखक,साहित्यिक तर आहातच परंतु मनी मानसी भाऊराया या नात्याने मनाने पुजलेली व्यक्ती नव्हे तर आपण मानवता जोपासणारी भक्ती आहात. भाऊराया आपण जगत असताना तुमच्या कृतीतून,लेखणीतून नेहमी आम्हास  सांगत आला आहात. 
    "भगिनींनो जरी घुंगटा, बुरखा, शेला यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रतिभेला, तुमच्या पुरुषार्थाला समाजातील नकारात्मक विचाराच्या माणसांनी अडकून ठेवलं असलं तरी तुम्ही जिद्द सोडू नका. वाटा सापडत जातील शोधत राहा... सावित्रीबाई फुले यांना आठवा. 
माणसं बदलत जातील स्वीकारत जा..परिस्थिती शिकवत जाईल...  शिकत रहा.. डॉ.बाबासाहेबांना मनी मानसी बसवा. 
येणारे दिवस निघून जातील... त्या आठवणी ते क्षण जपत जा...
जगताना विश्वास तोडून अनेक जातील, स्वतःला सावरत जा.
माणसान माणसासारखं वागायचं  खंबीरपणे सांगत जा. 
प्रसंगी परीक्षा  होत राहतील.. तेव्हा ठोसाला ठोसा दिल्यानंतर सुद्धा क्षमा विरस्यभूषणम हा भगवान महावीरांचा विश्व मैत्रीचा संदेशानुसार आपला पुरुषार्थ दाखवत जा.!! हे आपले विचार 
माणसांमध्ये माणुसकीची पेरणी करणारे आणि जातीभेदाला फाटा देणारे, राष्ट्रीय एकात्मते साठी खूप महत्त्वाचे. 
            आपण लिहिलेलं ललित साहित्य उपेक्षितांची पहाट, जीव रंगला रंगला, आत्मकथेचे रंग हे  आपलं ललित लेखन वाचल्यानंतर असं वाटतं.अहो..!जात्याचा खालचा दगड स्थिर असतो, आणि वरचा दगड फिरणारा असतो.. दोन्हीही दगड फिरणारे असते तर पीठ झाले नसते.
आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरत राहिला तर संकटे, काळजी आणि चिंता यांचे पीठ होते.ते माणुसकीच्या चाळणीने चाळल्यास निश्चितच जीवन सफल झाल्याचा आनंद मिळतो.
पिंपरी चिंचवड येथे भरलेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद आपण भूषविले आणि प्रत्यक्ष आपणाला ऐकण्याची संधी आम्हा साहित्यिकांना मिळाली. 
आपले विचार व  विचारानुसार आपल्या आचार....! खूप महत्त्वाचा "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले." 
    आपण नेहमी परखडपणे सांगता,’आपण केलेल्या कृतीला नाव ठेवणारी अनेक लोक भेटतील या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका. कारण चांगलं म्हणणाऱ्या लोकांची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त आहे.’
          श्रीपाद भाऊ तुमच्या या कृतिशीलते मुळेच आपण साहित्यरुपी अक्षय धन आपल्या परिश्रमातून समाजासाठी उपलब्ध करून दिले आहे. या सरस्वतीच्या आराधनेने माणूस घडविण्याचे काम,राष्ट्र उभारणीचं काम आपल्या हातून होत आहे. आपली वयाची ७५ वी साजरी करत असताना आम्हा साहित्यिकांना खूप मोठी उपलब्धी आपण आपल्या साहित्यकृतीतून निर्माण करून दिली आहे. ज्ञानेश्वर ते आंबेडकर, संतत्व आणि देवत्वाचा शोध, इस्लामी संस्कृती आणि मुस्लिम मराठी साहित्य, महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान या ग्रंथाचे केलेले संपादन अशा ६२  ग्रंथांची आपली संपदा आहे .आपल्या लेखनातून सतत जाणवतं की तुम्ही किती मोठे व्हा.आकाशात रोज भरारी घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या... कारण आपल्या यशावर आपुलकीने टाळ्या वाजवणारे, आपले अस्तित्व टिकवून ठेवणारे आणि आपल्या 
दुःखाची जाणीव राखणारे आपले सर्वजण खाली जमिनीवरच राहतात. याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हा संस्कार आपण आपल्या लेखणीतून संस्कारित केलेला पदोपदी आढळतो. 
  प्रत्येकाच्या जीवनात  सुवर्णकाळ, संकटाचा काळ  ठरलेलाच असतो.. पण त्याचा मुक्काम कायम कधीच नसतो. सुखा नंतर दुःख, दुःखानंतर सुख येतच राहतं. सुखान कधी हुरळून जाऊ नका आणि दुःखानं कधीच कोमेजू नका. आपण आपलं कार्य करत रहा. 
मी लिहिलेल्या समकालीन मराठी जैन कथा या पुस्तकाचे पाठराखण लिहून या जगण्यावर शतदा. ..! या  कथासंग्रहास लिहिलेली पाठराखण आपल्या वैचारिक प्रगल्भतेची, आपल्या प्रतिभेची तसेच बहुश्रुत बहु आयामी अशा चिंतनाची खोली पाहून मला सतत आपले साहित्य वाचनासाठी प्रेरित करते.आपला सखोल, अभ्यास व्यासंग चौफेरदृष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा वाटला. कारण सत्याचा शोध घेण्यासाठी कोणती सीमा नसते. त्याप्रमाणे जात-पात किंवा धार्मिक सीमा माणूस म्हणून जगताना नसाव्यात. हे आपलं विचार सूत्र आम्हा  महिलांसाठीच नव्हे तर अखिल मानव जातीसाठी महत्त्वाचे आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना भूतकाळातील  अविधायक, कालबाह्य झालेल्या रुढीपरंपरेंना फाटा देऊन  विज्ञानाची कास धरून आपण जगलो तर जगलो अन्यथा. ..! 
 मला आठवतंय स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेले  अखिल भारतीय 15 व्या स्त्री साहित्य संमेलनातील परिसंवादाचे आपण अध्यक्ष होता. महिलांच्या लैंगिक शोषणाबरोबरच, महिलांच्या लैंगिक उपासमारेबद्दल आपण परखडपणे मांडलेले विचार महत्त्वाचे होते. रस्ता चुकणे चुकीचे नसते; पण रस्ता चुकत आहे हे कळून सुद्धा त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे ठरते... यासाठी आपल्यासारख्या लेखकाच्या शब्दप्रहारांन  समाजातील विकृतीला दूर सरकवून महिलांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपलं साहित्य,आपली भाषणे, आपले विचार सर्वांसाठीच मोलाचे आहेत. 
 आपणाला चांगलेच ठाऊक आहे विश्वास ठेवा श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात..!!
लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक  हे बरंच काही  शिकवुन जाते. हे सार कोणतीही शैक्षणिक  डिग्री शिकवत नाही. हे आपले बोल पुन्हा पुन्हा विचार करायला लावतात. जे मोफत मिळते ते अत्यंत मौल्यवान असतं... हवा, पाणी, झोप, शांतता आणि आपला श्वास...!!
अधिकार मागणारे सगळेच असतात... जबाबदारी घेणे मात्र प्रत्येकाला जमत नसतं. या सर्वांची जाण आपण आपल्या लेखणीतून दिली आहे. 
जगात अशक्य असं काहीच नाही... तुम्ही चाळणीतून सुद्धा पाणी नेऊ शकता. फक्त त्या पाण्याचा  बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागते. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीमुळे कोट्यावधी लोकांची मने जिंकण्याची शक्ती असते.
. मी आपल्या घरी गेले होते त्यावेळी वहिनींनी केलेलं हसतमुख स्वागत मनाला खूप भावलं एवढी मोठी व्यक्ती परंतु साधं राहणं आणि काहीही न घेतल्याशिवाय घरातून जाऊ न देणे या गोष्टी संस्कार संस्कृती जपत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या वाटतात. जी माणसं "दुसऱ्याच्या" चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात... त्याची ही वागणूक त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. याची प्रचिती स्वानंद च्या पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य संमेलनाच्या आपल्या दिवसभरातील सहवासामुळे आम्हाला मिळाली.
आपल्या विचारांचा चिंतन केलं असता असं लक्षात येतं जर दुसऱ्यांचा आदर मान सन्मान करता येत नसेल तर जीवनात कितीही दान पुण्य करा. त्याचा कांहीच उपयोग नाही...!! विचारवंत प्रज्ञावंत भाऊराया आपले दिवस सतत कामात गेले रात्र सुद्धा प्रबोधनासाठी लिखाणात गेली .मन अनेकांच्या मनाचा ठाव घेत उभारी घेत आहे, आपलं अहव्यात काम चाललेलं आहे .आणि आपण आपलं आयुष्य  मरावे परि किर्तिरूपे उरावे अशा पद्धतीने समाज उपयोगी कार्यासाठी धावत आहे. आपणास व आपल्या परिवारास या अमृत महोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
प्रा सुरेखा प्रकाश कटारिया. 
माजी उपप्राचार्य भारतीय जैन संघटना
श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा-राष्ट्रीय उपाध्यक्षा. 
संस्थापक अध्यक्ष- स्वानंद महिला संस्था

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड