चिंतन चातुर्मासातील श्रुत आराधना
*चिंतन*
*चातुर्मासातील श्रुत आराधनेचे..!*
आराधना सरस्वतीची की लक्ष्मीची...?
लहान असताना आम्हाला वाटायचं गाडी, बंगला, पैसा आला की श्रीमंत होतो. जस जसे मोठे होऊ लागले पुस्तकांच्या गराड्यात सतत राहू लागले अनेक आत्मचरित्र वाचली.छोटी छोटी पावले मोठी मोठी होत असताना पैसा किती महत्त्वाचा हेही लक्षात येऊ लागले, तरीही...!
पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाही .*श्रुत ज्ञान का झरना या परिवर्तन व्याख्यानमालेतून जगणं उलघडत गेलं.त्या गुरुमैयेला मीरा परमपूज्य अर्चनाश्रीजी महाराज साहेब आदी ठाणा यांच्या चरणी नमन वंदन!*
अर्थात
श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी व्यापक आहे. भगवान महावीर स्वामींनी दिलेली अंतिम देशना उत्तराध्ययन सूत्रामध्ये वाचली, गुरु भगवंतांच्या मुखातून जाणली.त्याचं मन चिंतन केले आणि *"श्री" नावाची सरस्वती माता ही लक्ष्मी मातेपेक्षाही मला वेगळी वाटली* ... समाजात वावरताना अनेक माणसे वाचली आणि वाचलेल्या माणसातून श्रीमंती याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. *श्रुतग्यान का झरना यातून उमगलं*
*श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, प्रेम, आपुलकी, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती गरजू लोकांना सहाय्य करण्याची भावना वगैरे वगैरे अनेक गोष्टी जाणल्या... आणि *प्रभूची वाणी अहिंसा परमधर्म जाणताना* हे लक्षात आलं की खरोखरंच पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या संकल्पना जगत असताना आढळून आल्या.
*विचारात पडले खरंचच प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होता; पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत...!*.
हे सार सांगत असताना मीरा परमपूज्य अर्चनाशी जी महाराज साहेब पुढे बोलत होत्या. आणि आम्ही विद्यार्थी जीवाचा कान करून ऐकत होतो.
समाजात असे अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची कदर नाही. वामार्गाने मिळविलेला पैसा आल्यास , त्या पैशाला शिस्तीचं वळण न राहता, तो पैसा घरात असला तरी त्याला नियोजन नसल्यामुळे व्यसनाधीनता, नको तिथे खर्च, बेफिकीरी, उधळपट्टी,अहंकार, काही गैरमार्गाने मिळवलेल्या पैसेवाल्यांकडे दिसते.
*मी किती महागाची पितो बघ. हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु ... !
आपली मुलं मुली मुलं काय करतात? कोणत्या शाळेत शिकवायचं? त्याचा विचार करताना वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसतो. आणि तिथूनच समस्यांना खतपाणी मिळतं.
आपण श्रीमंत आहोत की पैसेवाल्या आहोत ? हा प्रश्न माझ्यासारख्या एका शिक्षकाला न पडेल तर नवलच...?
मी पाहिलेली जी माणसे वाचली, अभ्यासली ती माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खूपच निराळी मला सतत भासत होती परंतु हा विचार जेव्हा उत्तराध्याय सूत्रातील प्रवचन माला ऐकत गेले. श्रवण भक्ती करत गेले. आणि माझे मन विस्तारत गेले.
मन विचार करू लागले अरे साधुसंतांनी जे सांगितले ते श्रवण करून जगणारी अनेक लोक समाजात मला दिसली.
कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक फर्निचर. कुणाला गाण्याची आवड, कुणाला कविता करण्याची, आवड कुणाला गझल करण्याची आवड, कुणाला शास्त्रांचा अर्थ समजून घेण्याची आवड,
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला व्याख्यान ऐकून तसं आचरण करण्याची सवय तर कुणाला चित्रं जमवायचा छंद... तर कोणाची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, कुणाला समाजसेवेची आवड...!हे सारे समाजातील कृतिशील श्रीमंत लोक...!!पाय जमिनीवर ठेवून चालणारी...!!!आकाशाकडे भरारी घेणारी तरीही पाय जमिनीवरच असणारी
आणि गंमत म्हणजे सर्व ते सुसंस्कृत विचाराने प्रेरित झालेली व त्याप्रमाणे आचरण करणारी लोक ...!साधुसंतांच्या मार्गदर्शनाने जीवन सुजलाम सुफलाम करून श्रीमंतीच जतन करत जगताना वेगळाच संदेश देत आहे.
कुठे जल्दबाजी नाही .
स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.
कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या तपस्यांची अनुमोदना करण्यासाठी जरूर आवर्जून जाणारी..
त्यांच्याकडे भेदभाव दिसला नाही .
*गम जाओ कम खाऊ नम जाओ याला साजेस वागणं म्हणजे उत्तराध्याय सूत्रातील परमपूज्य मीरा अर्चना श्रीजी महाराज साहेबांनी श्रीमंती या शब्दाचा सांगितलेला अर्थ समाजामध्ये याचा शोध घेतला असता मला समाजातील काही व्यक्तींची अनुभूती मिळाली.*
त्यावेळी लक्षात आलं भले कौरव शंभर असू देत परंतु पाच पांडव व त्यांचं वागणं अखेर विजयी ठरलं त्रास दोघांनाही झाला परंतु पैशावाल्याचा विजय न होता श्रीमंत असणाऱ्या पाच पांडवांचा विजय झाला
*संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...*
पैसेवाल्यांनाही श्रीमंत होता येत तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या... भगवान महावीर स्वामींनी आपल्या अंतिम देशने मध्ये सांगितलेले. परम पूज्य अर्चना श्री जी महाराज साहेब आपल्या वाणीने श्रुत ज्ञानाचा धबधबा या सर्वांच्या मनावर ठसवत होत्या. कसं जगायचं हे सांगत होता.
चार महिन्याच्या चातुर्मास न होता पाच महिन्याचा पंचम मास समाप्तीकडे जात असताना मनातील अंतरिक बोल उतरविण्याचा प्रयत्न केला आहे
सर्वांनी श्रीमंत व्हावे हीच मनोकामना !
*चिरकाल स्मरणात राहणारा हा श्रुत ज्ञान झरना*🙏🙏🙏
प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया चिंचवड पुणे33