गुढीपाडवा चिंतन
आजचे चिंतन-गुढीपाडवा
दि.९/४/२४ मंगळवार
----------------------------------------
एक विकत घ्या,त्यावर एक फुकट मिळते. विचार केला तर ही एक व्यापारी पध्दत आहे.
परंतु ती आपल्या जीवनाशी निगडित आहे. आज गुढीपाडवा या गुढीपाडव्यानिमित्त निसर्गात होणारे बदलही आपल्या जीवनाशी निगडित आहेत. पानाला नवी पालवी फुटण्यापूर्वी जुनी पान पानगळीत रूपांतर होऊन आपलं अस्तित्व स्वतः बाजूला ठेवून नवीन पानाना, फुलांना आपली जागा देतात. याच ऋतूत कोकिळा गाणी गाते.
आपल्यासमोर आवाजाने वसंत आल्याचा या उन्हाच्या काहीली मध्ये सुद्धा सुखद अशी अनुभूती देत असते. हे सारं आपल्या जीवनाशी निगडित आहे.
जर आपण विश्वास विकत घेतला तर आपल्याला मैत्री फुकट मिळते, श्रीराम व विभीषणासारखे
जर आपण व्यायाम विकत घेतला तर हनुमान सारखे आपल्याला निरोगी आयुष्यफुकट मिळते,
जर आपण शांती विकत घेतली तर आपल्याला कुबेराची समृद्धी फुकट मिळते,
जर आपण प्रामाणिकपणा विकत घेतला तर राजा हरिश्चंद्र सारखा आपल्याला स्वाभिमान फुकट मिळतो.
जर आपण राग विकत घेतला तर आपल्याला ऍसिडिटी फुकट मिळते,
जर आपण ईर्ष्या विकत घेतली तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते,
जर आपण द्वेष विकत घेतला तर आपल्याला अल्सर फुकट मिळतो,
जर आपण ताणतणाव' विकत घेतला तर आपल्याला रक्तदाब फुकट मिळतो,
आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे, की आपण काय विकत घेतलं पाहिजे. हे आपण आपलं ठरवायचं कारण गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर सुंदर जगण्यासाठी संकल्प . कारण आयुष्य हे एकदाच आहे, सर्वांशी प्रेमाने रहावे, लोखंड वितळले की औजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते, अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. कोणाचा अपमान न करता त्याच्या भावनांची कदर करायला हवी. तर मग चला आज संकल्प करूया *या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोंड सांभाळूलया, तोल संभाळता आला नाही तरी चालेल पण तोंड सांभाळून. सुंदर आयुष्य सहज घडवण्यासाठी जाणीवपूर्वक जगूया*
एखाद्या वाक्याने शाब्बासकीची थाप देऊन,कौतुक करून कोणाला आनंद होत असेल मानसिक समाधान मिळत असेल तर... ही देखील एक प्रार्थनाच...! अशी प्रार्थना गुढीपाडव्याच्या निमित्ताने जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबत करूयात.
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ..!* 🌹🌹🌹
प्रा सुरेखा प्रा. प्रकाश श्री. श्रेयस सौ शालाका कटारीया, समस्त कटारीया परिवारा रांजणगाव गणपती