बापमाणूस सुरेश गादिया
चिंतन
*बाप माणूस सुरेशभाऊ*
*आदरणीय कमला भाभी आपल्याला नमन वंदन..*!आपल्या वर्ष तपची साता विचारत असतानाच सुरेश भाऊ या जगात नाही,अशी वार्ता आली आणि मन भूतकाळात गेलं.
सुरेश भाऊ म्हणजे सांगण्यापेक्षा समजण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर, बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा कृतिशील माणूस!!*
आक्रमकतेला चातुर्याने भिडणारा
परिणामांची जाणीव झाल्यावर काय कृती करावी याचा विचार करणारा ...!
आज समाजावर चहूबाजूंनी रोरावत येणारी संकटं त्याला समोर जाण्यासाठी सगळ्यांना बळ देणार हे असं व्यक्तिमत्व .
राजकीय वारसा लाभलेले हे गदीया कुटुंब ...! मंगलभाऊ,प्रकाश भाऊ, अभयभाऊ, चिरंजीव संदेश व सर्व गदिया परिवाराला नव्हे तर सर्व समाजाची न भरून निघणारी त्यांची अनुपस्थिती.. ..
कधीकधी संकटापेक्षा त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी केलेली कृती मोठं संकट निर्माण करते . परिणामांचा अभ्यास करून आक्रमकतेला चातुर्याने सामोरे जाणं सुरेश भाऊने सहज साधल.
*मीरा परमपूज्य अर्चना श्रीजींच्या महाराज साहेबांच्या चातुर्मासामध्ये पाच महिने चिंचवड स्टेशनला जैन स्थानकामध्ये जाण्याच योग आला. आणि त्यामुळे सुरेश भाऊचं सानिध्य आम्हा सर्वांना लाभलं. यशस्वी चातुर्मास. ..!अनेक जणांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार ठरला*.
आम्ही मायलेकींनी जेव्हा परमपूज्य प्रमोद सुधाजी महाराज साहेबांच्या डॉक्युमेंट्री फिल्म चे काम हाती घेतले होते. तेव्हा सुरेश भाऊनी केलेल्या सहकार्य हे फार मोलाचं होतं .त्यावेळी त्यांच्या स्वभाव अनेक कंगोरे अनुभवता आले. *ते सांगायचे निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जातं, रहस्य पचलं नाही तर धोका वाढत जातो, दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जातं म्हणून कोणाच्या प्रभावात जगू नये आणि कोणाच्या अभावातही जगू नये हे जीवन आपलं आहे आपल्याच स्वभावात जगा. प्रसंगी शांत राहून संयम कसा राखावा व आपले मत योग्य वेळी कसे मांडावे यांचे प्रात्यक्षिक म्हणजेच सुरेश भाऊचे जीवन होय .!!
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली
*प्रा प्रकाश प्रा सुरेखा कटारिया समस्त कटारिया परिवारा रांजणगाव गणपती*
*स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली*