माता त्रिशला पुरस्कार 20 एप्रिल 2024

*स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स*

*महावीर  निमित्त माता त्रिशला,माई रमा पुरस्काराचे वितरण*
----------------------------------------
       माननीय संपादक नमस्कार

    *दि. 21/4/2024 शनिवार*
रोजी तळेगाव वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबाच्या सानिध्यात
*माता त्रिशला माई रमा पुरस्कार  वितरण* पुरस्काराच्या मानकरी 
*1)श्रीमती जीवन बाई सुनील पगारिया* वय वर्ष 100 यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल माता त्रिषाला व माई रमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2) *श्रीमती लीला मधुसूदन कुलकर्णी* वय वर्ष 88 मध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्याचा सन्मान करण्यात आला. 
3) *श्रीमती उर्मिला भरतकुमार छाजेड* वानप्रस्थ आश्रमातील सचिव  प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेवाभावी  महिलांना माता त्रिशला व माई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचे वितरण हस्ते मा. अजित पाटील, संस्थापक अध्यक्ष, महावीर भगवान अहिंसा ट्रस्ट निगडी.
प्रमुख उपस्थिती- मा. उमेश पाटील ,अध्यक्ष, जैन महासंघ पिं. चिं. श्रीकृष्ण मुळे- अध्यक्ष, वानप्रस्थ आश्रम, शोभा बंब- स्वानंदच्या अध्यक्षा,डॉ अलका भळगट , समाजसेविका, प्रा सुरेखा कटारिया-  राष्ट्रीय उपाध्यक्ष- श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा    प्राध्यापक प्रकाश कटारिया  माजी उपप्राचार्य, आनंदी पगारिया ,सुभाषजी सुराणा, पारसजी राका यांच्या उपस्थितीमध्ये व वानप्रस्थ आश्रमातील आजोबाजींच्या सानिध्यात हा कार्यक्रम *महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या आनंदात* पार पडला. त्यावेळी  चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले. 
*विषय- बढे बुजुर्ग युवा पिढ्यों के लिय संस्कार का खजिना है क्या ?* याचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता राठोड यांनी केले. 
 या चर्चासत्रामध्ये संस्कार कृतीतून होतात.सांगून  बोलून होत नाही. यावर प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले. त्यासाठी आपण सर्वांनी काय करायला हवं याचेही मंथन झाले. या मंथनातून चिंतनातून येणाऱ्या भावी पिढीसाठी पालकांनी आणि बालकांनी स्वतःमध्ये काय परिवर्तन करायला हवे. या अनुषंगाने वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबानी ही आपले विचार मांडले. यासाठी सर्वात *महत्त्वाचे म्हणजे संस्कार होय* . यावेळी वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबा  समवेत गप्पा गोष्टी मारून त्यांची मने हलके करण्याचे काम स्वानंद च्या भगिनींनी केले. संवाद हरवत चालला आहे, त्यामुळे मनात उदासीनता येते. नैराश येते. म्हणून हा गप्पा गुजगोष्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बंब  यांनी केले स्वानंद सखीचे मनोगत सुनीता लुणावत यांनी केले .कंचनमाला बाफना व स्वानंद ग्रुप यांनी स्वागत गीत व कल्पना  शिंगवी या स्वानंद ग्रुपने नवकार महामंत्र सादर करून भावनिक  वातावरण निर्माण केले. आभार प्रा सुरेखा कटारिया यांनी मानले. 
कार्यक्रमाचे संयोजन डॉ श्वेता राठोड, उज्ज्वला कुंकूलोळ, कल्पना बंब, सविता भंडारी यांनी केले.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड