गझल

रदिफ- तुझ्यासाठी

कवाफी - कुंपण, पैंजण, गंठण, तोरण, तारण, सारण, भूषण, भूषण, वंदन, चंदण, भरण पोषण कंकण, वंगण,भणभण, वणवण, चणचण, छणछण, गण गण, तणतण,क्षणक्षण, रणरण



*सख्या माहेरचे  मी सोडले  अंगण तुझ्यासाठी*
*सदा  आयुष्य माझे ठेवले तारण तुझ्यासाठी*

*सदा  वाटेत काटे चालते ती अडचणी मधुनी*                                   
*तुझे तर लक्षही नसते तिची वणवण तुझ्यासाठी*

*नवी फॅशन नवा  फंडा तरीही  लावते कुंकू*
*जुन्या रीती प्रमाणे घालते गंथण तुझ्यासाठी*

*मला तो वाद आठवतो तुझ्या माझ्यात झालेला* 
*तुझी ओढ मज भेटण्या करते  गण गण तुझ्यासाठी*


*तुझी तर कोरडी भाषा बघे व्यवहार  पैशांचा* 
*मनाची तरलता  जोडुन सदा गणगण तुझ्यासाठी*

सुरेखा

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड