गझल सौदामिनी

आता नवीन शेराची लगावली बरोबर आहे.


वृत्त- सौदामिनी
लगावली - लगागा लगागा लगागा लगा
रदिफ - मिळो

कवाफी-सहारा किनारा उतारा निवारा पिसारा उबारा घसारा फवारा

मतला

*सदा लेखणीचा सहारा मिळो* 
*सुखाचा मनाला किनारा मिळो*

*तुझे  नाम  घेता  सदा विठ्ठला*
*सदा सावलीचा निवारा मिळो*

*नको  धर्म  तंटा  नको भांडणे*
*पुन्हा  शांतते चा उतारा मिळो*

*किती वाट पाहू तुझी साजणा*
*तुला  भेटण्याचा  इशारा  मिळो*

*व्यथांनी तिचा कोंडमारा सदा*
*सुखाच्या क्षणांचा उबारा मिळो*

सुलाखून तावून पोलाद बन
असा लेखणीला निखारा मिळो

सुरेखा

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड