दिवाळीनिमित्त शुभेच्छा चिंतन

दिवाळी निमित्त 
-----------------------------
लेखिका- प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे  
दि .9/11/2023

---------------------------
शब्दांचा महिमा गाताना संत कबीरदास म्हणतात,
"शब्द शब्द सबको ये काहे 
 शब्द के हात न पाव 

एक शब्द औषध करे

 *एक शब्द करे घाव सुंदरता,कोमलता हे स्त्रीचे सौंदर्य , पराक्रम हे पुरुषाचे सामर्थ्य तद्वत शब्द हे भाषेचे सामर्थ्य तर अर्थपूर्णता हे शब्दाचे सौंदर्य असते. दिवाळी दिव्यांचे सौंदर्य अधिकच महत्त्वाचे असते* .
ज्ञानार्जन करून परिपक्व होणारे विचार व्यक्त करण्यासाठी सशक्त असे साधन म्हणजे शब्द होय. शब्दाने ज्ञान वाढते. शब्दानेच विचारांचा उदय होतो. या हृदयीचे त्या हृदयी पोहोचवण्यासाठी शब्द भंडार महत्त्वाचा असतो. 
शब्द हे शस्त्र आहे आणि शास्त्र आहे कारण आंधळ्याची मुलं आंधळीच असणार, अशा शब्दांच्या बनलेल्या  वाक्याने महाभारताचे युद्ध झालं. लुटारू वाल्या कोळ्याला नारदान सांगितलेल्या एकाच वाक्याने आपल्याला वाल्मिकी ऋषी मिळाले. रामायणा सारखं महाकाव्य प्राप्त झालं. अर्जुनाला दिलेल्या एका वरामुळे एकलव्याचा अंगठा कापला गेला. कैकयीने मागितलेल्या दोन       वरांमुळे रामाला वनवासाला जावं लागलं. 'नरो वा कुंजरोवा' या वाक्यामुळे द्रोणाचार्यांचा वध झाला. 

 एक शब्द तारतो तर एक शब्द मारतो. मारतो ये शस्त्र आहे आणि    तारतो हे शास्त्र ! अशाप्रकारे शब्द शस्त्र आहे आणि शास्त्र ही आहे. हे आपल्या छोट्या  दोह्यामध्ये  संत कबीरानी मोठा अशाय  सांगितला;तर संत तुकाराम म्हणतात. "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

 शब्दांचीच शस्त्रे यत्न करू 

शब्दांची आमच्या जीवाचे जीवन 

शब्द वाटू धन जन लोका

 तुका म्हणे पहा शब्दाची हा देव

 शब्द गौरव पूजा करू

 गवताच्या गंजीत पडलेली एक ठिणगी क्षणात सर्व जाळून भस्म करते, तर घनघोर अंधकाराचा नाश  दिव्याची एक ज्योत एका क्षणात  प्रकाश पसरवू  शकते.  अहिंसा शब्दाचा उच्चार करताच भगवान महावीराची आठवण येते. दान शब्द उच्चारताच दानशुर कर्ण आठवतो.भक्ती म्हटलं की हनुमान. क्रोध म्हटलं की दुर्वास.धर्म म्हटलं की धर्म राज युधिष्टर.हे आपल्या डोळ्यासमोरुन सहज उभे राहतात. कित्येक वेळा प्रार्थने शिवाय शब्दापेक्षा, शब्दाशिवायची प्रार्थना भगवंतापर्यंत पोचून जाते. प्रार्थना हाच एक शब्द आहे .जे शास्त्र आहे.
शब्द जेव्हा मनाला बोचतात,बोचऱ्या शब्दांनी हळवे लोक मनातच झुरतात.
 शब्द जेव्हा तोंडातून बाणासारखा सुटतो व सुटला की थेट काळजात जाऊन भिडतो. शब्दांना सुद्धा असते तलवारीची धार! हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, शब्द युद्धात होतात, शब्दांचेच वार ,शब्दांची अस्त्रे शब्दांचेच वार, शब्दांच्या चकमकीत शब्दच होता ठार !
शब्द कधी माणसे जोडतात तर कधी माणसे तोडतात. त्यासाठी शब्द जपून वापरा.आपणास दोन कान व एक तोंड या शरीर रचनेचा संदेश असा आहे की,एक पट बोलावे व दुप्पट श्रवण करा. तसेच आपल्या या तीन इंची जिभेला दाताच्या बत्तीस कोटा मध्ये ठेवले आहे. याच्यासाठी की आपण जपून बोलावे. नाही तर आपण म्हणतोच 'तुझ्या जिभेला हाड आहे की नाही?' 

खरोखरच शब्द तेच कि जे चिंतनात परिणत होतात. खरंच चिंतन तेच कि ज्यांची परीणती आचरणात होते. 
काय करावं ,काय करू नये .
याचं स्पष्टीकरण या दोन संतांनी सांगितला आहे.

 *काय करू नये ते महाभारत सांगत.काय करावं ते रामायण शिकवत कसं जगावं हे उत्तराध्यय सूत्र भगवान महावीरांची अंतिम देशना सांगते*. 
काय करायचं ते आपण आपलं ठरवायचं असतं. कारण शब्द हे शस्त्र ही आहे व ते शास्त्र आहे.
भगवान महावीरांच्या निर्वाण कल्याण निमित्त सर्वांना नमन वंदन*
*प्रा सुरेखा  प्रा प्रकाशजी कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड