एकपात्री कलाकार संतोषजी चोरडिया
एकपात्री कलाकार संतोषजी चोरडिया यांच्या स्वर्गवासाची बातमी ऐकली आणि मन खिन्ह झाले.
समाजात उत्स्फूर्तपणे काम करणारी समाजाला सतत हसवण्यासाठी प्रयत्न करणारी, सकारात्मक ऊर्जान भरलेले माणसं गेली की समाजाची खूप मोठी हानी होते. ती हानी आज आपणा सर्वांची झाली आहे. ती कधीही भरून न येण्यासारखी आहे
तो क्षण मला आजही आठवतोय सूर्यदत्ता फाउंडेशन ने दिलेला समाजभूषण पुरस्कार २०२३ चा घेत असताना त्यांनाही कलाक्षेत्राचा समाजभूषण पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले होते. तेव्हा आमची गाठ झाली .त्यावेळीच ठरवलं होतं की आपण एकपात्री कलाकाराचा कार्यक्रम ठेवून .त्याचा आनंद घ्यायचा.
त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासातून आढळत आलेले काही त्यांचे विशेष पैलू. .स्वभाव लोकांमध्यें विश्वास निर्माण करू शकतो.. तुमची संपत्ती नाही!! यावर ते ठाम होते. असा त्यांचा मन मिळवून स्वभाव होता.
. प्रयत्न करताना चुका होतातच... चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून जे मिळते ते यश... ते यश या एकपात्री कलाकाराने संपादित केले होते.
शरीर मे कोई सुंदरता नही होती. सुंदर होते है व्यक्ती के कर्म, उसके विचार, उसकी वाणी, उसका व्यवहार, उसका संस्कार और उसका चरित्र.... जिसके जीवन में यह सब है वही इन्सान दुनिया का सबसे बडा अच्छा इन्सान है.!! संतोष जी एक अच्छे इंसान थे lआयुष्यात अशा माणसाचं असणं खूप आवश्यक असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते.
माणसाला कधी कधी पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात.
या जीवनात कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते.आज वाऱ्याने उडणारा कोरडा पाला पाचोळा तर कधीही कालची नयनरम्य निसर्गानं फुलविलेली जीवन बाग. जिथे निर्मिती आहे त्याचे निर्मूलन सुद्धा ठरलेले असते. पण हे असं अचानक जाणं म्हणजे परिवाराला, समाजाला चटका लावून जाणारा असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. हेच सांगते एकपात्री कलाकार संतोषी च्या जगण्यातून. ..!जीवन हे क्षणभंगुर आहे त्याला आनंदी बनवा.आयुष्य हा प्रवास आहे स्पर्धा नाही.
. जीवनात दोनच उद्देश ठेवणारे... जे हवे आहे ते मिळवणे आणि जे मिळाले आहे त्यात आनंद घेणे. हा आनंद संतोष भाऊंनी घेतला. त्यांचं या जगात नसणं त्रासदायक होत आहे तरी त्यांनी पेरून ठेवलेलं सत्कार्य आज उगवत आहे . त्यांनी अनेकांना आपल्या एकपात्री कलाकृतीतून आनंद दिला.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
शोकाकुल
स्वानंद महिला संस्था, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट व समस्त महिला वर्गाकडून भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🌹🌹
आपली भगिनी प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.