सहाव्या माळीनिमित्त कर्मयोगी शंकरलालजी

*सहाव्या माळे निमित्त* 
*कर्मयोगी शंकरलालजी* 
 नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!* 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 *माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दु:ख किती आहे.संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे.गर्व सांगतो पैसा किती आहे.भाषा सांगते माणुस कसा आहे.ठोकर सांगते लक्ष किती आहे.आणि सर्वात महत्त्वाचे वेळ सांगते नातं कसं आहे...!* हे असं अनेक नातं जपणारे संस्थेला 45 वर्षे सेवा देऊन जैन विद्या प्रसारक मंडळाला अधिक उंचीवर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदरणीय शंकरलालजी मुथा उर्फ भाऊ
       जीवन खूप सुंदर आहे ते अधिक सुंदर करण्यासाठी निस्वार्थपणे प्रेम करणं खूप महत्त्वाचा आहे. हेच सांगते सहाव्या माळीतील संस्कार संस्कृती आणि आपली आध्यात्मिक बैठक...! अशीच आध्यात्मिक बैठक असणारे आमचे *सन्माननीय शिक्षण महर्षी शंकरलालजी जोगीदाजी मुथा* आज त्यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पिंपरी चिंचवड मध्ये जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये...!
*धुरंदर व्यक्तिमत्व  लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होत आहे*. 
अखंड 45 वर्ष संस्थेमध्ये  निस्वार्थ सेवा देऊन अजरामर होणारे. ..!भावी विद्यार्थी पिढी घडवण्याचे काम करणारे अध्यात्मिक, शैक्षणिक संस्कार आणि संस्कृतीचे जतन करणारे शंकरलालजी मुथा आज नाहीत परंतु त्यांचे संस्कार आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरांमध्ये दिसून येतात. 
*माणसाचं घडणं हे त्याच्या विचारांवर अवलंबून असतं, तो जसा विचार करतो तसाच घडतो. याचं प्रात्यक्षिक म्हणजे आदरणीय शंकर भाऊ होय* मला आजही ते दिवस आठवतात
आम्ही घेत असलेल्या *अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात ग्रंथ दिंडी पूजनासाठी ते नेहमी येत असतं आणि आम्हा महिलांना आशीर्वाद देत असत. आज त्याची प्रखरतेने आठवण  येत आहे. कारण स्वानंद महिला संस्थेने घेतलेले हे साहित्य संमेलन म्हणजे स्वानंदची ओळख होय. ही ओळख अधिक दृढ करण्याचं काम भाऊंच्या आशीर्वादाने झाले. असे आम्हा महिलांना वाटते. आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना आम्हा सर्व महिलांना खूप खूप आनंद होत आहे. या नवरात्रीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. 
आपलीच भगिनी 
*प्रा. सुरेखा प्रकाशजी कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष -श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला एवम*
*संस्थापक अध्यक्ष- स्वानंद महिला संस्था पिं चिं*.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड