अद्भुत शक्ती पीठ नवरात्र लेख

*अद्भुत शक्ती पीठ* ! 
🌷🌷🌷
स्वामी विवेकानंदांनी आपल्या वडिलांना विचारले तुम्ही मला काय दिले आहे? 
वडील- तू आरशासमोर जाऊन पहा .तुला काय काय दिलेले आहे .हे मी न देता त्या अद्भुत अशा शक्तीने दिलेला आहे. याची जाणीव तुला होईल.त्याचा योग्य वापर कर. 
स्वामी विवेकानंद लक्षात येईना ते खरोखरच आरशासमोर जाऊन उभे राहिले.आणि आरशाकडे पहात स्वतःला निरखू लागले.निरखता निरखता केसापासून नखापर्यंत त्यांची नजर गेली आणि विचार करू लागले खरोखरच किती भरभरून दिलेले आहे या अद्भुत शक्तीने...! 
 खरोखरच मी काहीही मागितले नव्हते .  तरीसुद्धा त्या नवरात्रीतल्या नऊ शक्तीने मला भरभरून दिले आहे. याची जाण आपल्याला संसारात घडी घडी होते.ज्यावेळी *आपला बीपी हाय होतो लो होतो*.त्यावेळी लक्षात येतं . चौविस तास होणार रक्ताभिसरण  आपल्या जगण्याला उभारी देत असतं. आणि  हे आदिशक्ती माता तू हे काम अव्याहात करत आहे.                                        
    अखंडपणे तू  आमचे हे  हृदय  चालवून अनेक हृदय जोडण्या साठी ती शक्ती आपण देतात ती शक्तीची ज्ञानपीठ तूच दाखवली आहेस. अव्यात चालणारे असे कोणते यंत्र तू  फिट करुन ठेवले आहे? 
हे आम्हा पामराच्या लक्षात येत नाही...
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेशवहन करणारी प्रणाली तुझ्या अदृष्य शक्तीने चालते आहे. याचा आम्हा मानवाला विसर पडला आहे. असे वाटते. म्हणूनच मी बाबांना प्रश्न केला बाबा तुम्ही काय केले आमच्यासाठी.. . ? 
शरीरात तयार होणारे *रक्त* ते कसे तयार केले जाते अद्यापही विज्ञानही सिद्ध करू शकले नाही. याची जाण मला आता होत आहे. कारण माझ्या मित्राला रक्तदान करत असताना माझे रक्त त्याच्या शरीराला चालते. म्हणजे हे अद्भुत शक्ती- *मानव जात ह्या फक्त दोन जाती आहेत एक स्त्री आणि पुरुष परंतु स्वार्थापोटी जाती पातीच राजकारण करून स्वार्थापोटी काम करणारे स्वतःच्या कर्मानेच कर्म बांधत आहेत*. याची जाण  आम्हाला आता होऊ लागली आहे. *हे सार वाचल्यानंतर मला आठवलं कोरोना काळातील जीवन. . . !*
हजार हजार मेगापिक्सलवाले डोळ्याचे दोन्हीही कॅमेरे अहोरात्र सगळी अद्भुत अशी दृश्य टिपून जगातील सुंदरता मनाला उभारी देत आहे. हजारोच्यावर चवीला चवीची जाण करून देणारा जीभ नावाचा टेस्टर याची जाण कोरोनाच्या काळात त्याचे महत्त्व अधिकच जाणवले.   संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली ..आणि
वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाजनिर्मिती करणारी स्वर प्रणालीत्या फ्रिक्वेंसीचे कोडींग रेकॉर्डिंग करणारे कान नावाचे यंत्र...पंचाहत्तर टक्के पाण्याने भरलेला शरीररुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही..स्टॅण्डशिवाय आम्ही तासनतास उभा राहू शकतो. गाडीचे टायर झिजतात, पण पायांचे तळवे  झिजत नाही. ही सारी अद्भुशक्ती तू आम्हाला दिली आहेस. संकटे आली तर शक्ती दिली. प्रसंगाला आला तर बुद्धी दिली. हे अद्भुत शक्ती तूच शरीरामध्ये बसलेल्या या आत्म्यास परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी सतत आम्हास जागृत ठेवतोस तुझे अनंत उपकार आम्ही...!तुझे उतराई कसे व्हावे हेच कळत नाही . 
        स्मृती, शक्ती, शांती  क्रांती कीर्ती हे सर्व  तु देत आहेस. तुच आत बसुन  या शरीर चालवत आहेस.
अद्भूत आहे हे सर्व,अविश्वसनीय,
अनाकलनीय.          
अशा शरीररुपी मशीनमध्ये कायम तुच आहेस, 
याची जाणीव करुन देणारा आत्मा तू असा काही *फिट* बसविला आहे की आणखी काय तुझ्याकडे मागाव......
तुझ्या या  शक्तीचा कायम ऋणी राहून मानव सेवा करण्याचे असेच पाठबळ दे.हीच तुझ्या चरणी प्रार्थना...🙏
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन! 
अशी  सद्बुद्धी मला दे!!
तूच हे सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव मला सदैव राहू दे!!! 
*नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ..!* 🌷🌷🌷🌷🌷🌷
*प्रा सुरेखा प्राप्रकाजी कटारिया चिंचवड पुणे*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड