आयुष्याच्या हिंदोळ्यावर शुभांगी कात्रेला

सौ शुभांगी व मनोज आपणास सुरेखा कटारिया चा व सर्व स्वानंद सख्यांचा खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा🪷

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्य विद्यालयात विद्यार्थ्यांना उदबोधन करून नवीन पिढी घडवण्याचे ज्यांनी  अविरतपणे काम केले आहे. असे सतराव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  या साहित्य संमेलनात कुठे हरवला शाम? या विषयावर कथाकथन सादर करण्याची संधी मला मिळाली. त्या सर्व भूतकाळातील आठवणी जागृत झाल्या.  माननीय न.म.जोशी सर,    
     त्याचबरोबर अनेक पुस्तकांचा धांडोळा घेऊन प्रश्न पर्व,अत्तरांचे दिवस, जाणिवांच्या ज्योती, घे भरारी, मनातल्या घरात अशा एक नव्हे अनेक पुस्तकांचे लिखाण करणारे जनजागृती करून माणूस घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीणजी दवणे, त्याचबरोबर ज्यांनी 700 पुस्तकांचे संपादन केलं आहे असे संपादक नितीजी हिरवे, व महत्त्वाचं म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे एकत्र आलेला आहोत. असा तो सुंदर पुस्तक सोहळा घडवून आणणाऱ्या लेखिका शुभांगी मनोजजी कात्रेला, व सुंदर नेटकं सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची लज्जत वाढवणाऱ्या डॉक्टर श्वेताजी राठोड व पियानोवर नवकार मंत्र साकार करणाऱ्या आनंद राठोड या कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या सर्व स्नेही बंधू आणि भगिनींनो
आजचा दिवस आम्हा सर्व स्वानंद सख्यान साठी खूप महत्त्वाचा, प्रेरणादायी,आनंदाचा उत्सव साजरा करणारा...!
शुभांगी व मनोज सर्व कात्रेला परिवारचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!! 
         लोक देवाकडे खूप कांही मागतात पण  शुभांगी न मात्र जन माणसांचे  सुख व फक्त प्रेमळ साथ मागितली म्हणूनच मनोज तिचा जीवनात आला. आणि जन माणसांसाठी आयुष्याच्या हिंदोळ्यावर झुले घेत असताना कधी सुख कधी दुःख याला कवठाळून न बसता. योग्य माणसाचा हात धरला तर चुकीच्या माणसाचे पाय धरायची वेळ येत नाही. हे दोघांनी कृतीतून दाखवून दिले. 
.*चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल फक्त बर्फ होईपर्यंत वाट पहावी इतका संयम ठेवावा लागतो*!!
  अशा संयमानं वागणारी आमची शुभांगी ...!
          शुभांगी तुझं काम तुझा पुरुषार्थ मी अगदी गेली तीस वर्षे झाले अभ्यासते .काम ऐक  काम करत असताना स्वानंद मध्ये स्वानंदी राहून ज्या उद्देशाने स्वानंद काम करत आहे. तो उद्देश तुझ्या या लेखन कार्याने योग्य पद्धतीने सफल होत आहे. अस वाटत. 
   तुझ निघालेलं पहिलं पुस्तक *आयुष्य जगताना आणि आता आयुष्याच्या हिंदोळ्यावर* दोन्ही पुस्तके माणसातला माणूस जागृत करण्यासाठी महत्त्वाची आहेत. 
   जग  आशा कार्याची दखल गाजावाजा न करता घेत असतं. 
 शुभांगी तुला ठाऊक आहे माणसाचे डोळे नश्वर सौंदर्यापेक्षा समोरच्याचं  अंतर्मन वाचत असतात या पुस्तकातून समाजातील विविध प्रकाराच्या व्यक्तींच्या अंतर्मनाचं वाचन व वेचन करण्याचं काम या पुस्तकाने केले आहे.
*सुख आणि दु:ख आपल्या कर्मानुसारच मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध नाही. रडणारा महालात सुद्धा रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो..!* हे तुला चांगलंच ठाऊक आहे म्हणूनच जैन इतर समाजातून येऊन सुद्धा दुधात साखर घालावी तशी तू विरघळून गेली आहेस. परंतु ते विरघळताना सुद्धा स्वतःच अस्तित्व तू जपलं आहेस. त्या दुधाचा गोडवा वाढवला आहेस म्हणूनच तुझी ही लेखन शैली ही सरस्वती आराधना तुझं वेगळं पण सहजतेने लोकांच्या मनावर लेखनाच्या माध्यमातून ठसत आहेस. 
    तुझा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे विश्वास तो विश्वास तू स्वानंद वर ठेवला आणि स्वानंदीच झाली. प्रत्येक माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकावे. कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते..! त्यामध्ये तू माहीर आहेस
. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात तर काही माणसे गरिबीला गुलाम करतात. शुभांगी तू मात्र   माणुसकीला प्रणाम करणारी आहेस. तीच माणसे  जगण्याचा खऱ्या जीवनाचा सन्मान करतात...!
मैत्री ही चिरकाल असली पाहिजे, ती चांगले किंवा वाईट परिस्थितीमुळे कधीच बदलली नाही पाहिजे.... यालाच तर मॅच्युरिटी म्हणतात. 
म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक गोष्ट ही आपली नसते.
. सकाळ म्हणजे नवीन क्षणाची सुरुवात... जे घडुन गेले आहे ते विसरून नवीन येणाऱ्या क्षणाचे स्वागत करणे. आणि आपल्या आयुष्याला आणखी सुंदर करणे....! हे तुझ्या कृतीतून घ्यावे असे तुझे वागणे. 
आज प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकास खूप खूप शुभेच्छा देते. वाचकांनी ते पुस्तक घेऊन वाचावे व आपल्या जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन अधिक वृद्धगीत करावा . 
शुभांगीची कन्या श्रुती- जावई सासू-सासरे व संपूर्ण परिवार समाज याच्यासाठी तू कॉलिटी वेळ देऊन कार्य करत आहेस. 
आपण फक्त चालतच राहायचं... अशा श्रद्धा,कल्पना, कीर्ती, यश, प्रगती आपोआपच मागे चालत  येतात...!
 आपणास व सर्व कुटुंबीय्यास विशेष मनोज कात्रेला कारण सहचार सहजीवन म्हणजे काय असतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मनोज व शुभांगी आपणा उभयंतांचं खूप खूप अभिनंदन करते. 
    खूप खूप शुभेच्छा...

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड