वर्तमान मे वर्धमान नारायणगाव व्याख्यान

व्याख्यान नारायणगाव महावीर जयंती निमित्त विषय - 
*वर्तमान मे वर्धमान*
*भ. महावीरांच्या प्रणालीतील पुरुषार्थाची विशेषता* द्विपात्री कार्यक्रम

सुरेखा- न हो फुलों की कीमत तो कही उपवन नही खिलते
मनही हो मरुधर तो कही सावन नही खिलते
मुझे लगता नही गुरुवार से पूजा है यहा कोई
जहा गुरुवर्य होते है वही सब पाप कटते है

* एखाद्या पारिजातकाच्या बीजान
* माता त्रिशला व राजा सिद्धार्थ यांच्या उदरी इसवी सन पूर्व 599 ची शुभघटना ही घटना घडण्यापूर्वी माता त्रिशलाला 14 स्वप्न पडली असा उल्लेख श्वेतांबर आगमग ग्रंथामध्ये आढळतो तर  दिगंबर आगम ग्रंथामध्ये  सोळा स्वप्नांचा उल्लेख केला जातो.

सीमा- ही  स्वप्न म्हणजे पांढरा शुभ्र हत्ती, पांढरा बैल, गर्जना करणारा सिंह, कमलासनावर बसलेली लक्ष्मी, फुलाच्या सुंदर माळा, पौर्णिमेचा चंद्र, तेजस्वी सूर्य, उंच जागी  लहरणारा ध्वज, चांदीचा कलश, रत्नाची  रास तर शेवटी पूर्णतः प्रज्वलित धूररहित असा अग्नी दिसला. या स्वप्नांचा अर्थ ज्योतिषाला  राजा सिद्धार्थने विचारला. 
          त्याने सांगितलं की शुभ घटका जवळ आली आहे. हा शुभ घटनेचा संकेत आहे. लवकरच पुत्रप्राप्तीचा योग आहे या वार्तेनं  माता  त्रिशला खूप आनंदी झाल्या  हरकून गेल्या.


सुरेखा- गर्भधारणा झाल्यापासून  सर्वत्र वृद्धी होऊ लागली. गर्भधारणा होऊन सुमारे सहा महिन्याचा काळ लोटला होता. गर्भस्थ जीवाच्या हालचालीने मातेला त्रास होत असल्याचे आपणा सर्वास ठाऊक आहे.   राणीच्या गर्भातील शिशुही हालचाल करीत होता. त्याचा त्यांना त्रास होत होता. भगवान महावीरांच्या जीवाने अवधी ज्ञानाने हे ओळखले आणि मातेला त्रास होऊ नये म्हणून आपली हालचाल थांबवली. 
 मातेला सुखी ठेवण्याचा हा विचार केवढा मोठा  विचार आणि विचारानुसार आचार असा  आदर्श समाजापुढे ठेवला. एकांत प्रिय चिंतन शिवभक्तीच्या वर्धमान यांना भोग उपभोगापासून अलिप्त राहणे आवडत होते तात्कालीन समाजा त धर्माच्या नावाखाली होणारी पशु हत्या धार्मिक अंधविश्वास उच्च नित्यच्या कल्पनाने बरबटलेली जातीयता ओ मानवी रूढींनी भरलेल्या समाजातील अनेक समस्यांनी त्यांचे मन वेतन होत होते दया प्रेम करुणा सहिष्णता बंधुभाव वाढावा असं त्यांना वाटत असे त्यासाठी दीक्षा घेऊन एकच जाणे महत्त्वाचे होते परंतु मातेच्या कुक्षीत असताना गेलेल्या संकल्प त्यांना दीक्षा घेऊ देत नव्हता आई-वडिलांना वाटले दीक्षा घेऊन वर्धमान घरातून निघून तर जाणार नाही ना या चिंतेने त्यांनी त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला त्यांनी आपली अन इच्छा व्यक्त केली परंतु मातेच्या आग्रहांमुळे त्यांनी विवाहाला संमती दिली मातेला कधीच दुःख द्यायचे नाही. इच्छा नसताना ही  विवाह संमती दिली व वसंतपूरचे महासामंत समर वीर  यांची रूप संपन्न कुत्री यशोदेबरोबर विवाह झाला.
यथाकाल यशोदेने एका मुली जन्म दिला तिचे नाव प्रियदर्शना ठेवण्यात आले इतके असूनही महावीरांचे मन संसारात रमलेच नाही इतक्या मोह पाशात राहू नये ते विरक्तच राहत होते पुढे आई-वडिलांनी देहत्याग केला भगवान महावीरांनी दीक्षा ग्रहण करण्याचा प्रस्ताव आपले वडील बंधू नंदीवर्धन यांना सांगितला हे ऐकताच ती खूप व्यतीत झाले दुःखी झाले आणि राजगादीवर अडून होण्यासाठी त्यांनी त्यांना विनंती केली आई वडील गेले आणि आता तुम्ही मला सोडून चाललेला आहात निदान माझ्यासाठी तरी दोन वर्ष तुम्ही राजपदाचा स्वीकार करा वडील बंधूंच्या आग्रा खातील त्यांनी हेही स्वीकारले
तारुण्य अवस्थेतील ही फार्म बोलकी घटना
                  परंतु  आजच्या समाज परिवर्तनात होत असलेले बदल पाहून मनाला वेदना होतात. कुठे आईला त्रास होतोय म्हणून स्वतःची हालचाल थांबवणारे भगवान महावीर व कुठे आजच्या मुलं आणि सुना सर्व काही असताना आई-वडिलांना वृद्धाश्रमाकडे बोट दाखवणारे आजची मुलं. ..!अत्यंत ज्वलंत अशी ही समस्या आज  अनेक ठिकाणी पाहायला मिळते. 
असा तुलनात्मक अभ्यास करत असताना समाजाची दयनीय अवस्था पाहताना सहज शब्द ओठावर येतात. 
*आई शोधलं तुला कुठे सापडत नाही  तू मला* 
*अग दुकानं धुंडाळली ऑफिसमध्ये पाहिलं पण गिर्‍हाईकाच्या मागे मागे फिरणारी आणि  बॉसची आजी करणारी  बाईच्या स्वरूपातली आई मला दिसली पण माझ्या मनातली आई मला भेटलीच नाही* 
*आई शोध शोधलं  तुला कुठे सापडत नाही तू मला*
 *अगं टीव्हीवर पाहिलं सिरीयल मध्ये पाहिलं*
*नटून थटून स्वयंपाक घरात जाणारी बाईच्या स्वरूपातली आई मला दिसली पण माझी आई मला भेटलीच नाही*
 *आई शोध शोध शोधलं तुला  कुठे सापडत नाही तू मला*

*अगं आई तुला फेसबुक वर शोधलं इंस्टाग्राम व्हाट्सअप वर  शोधलं पण मला तू कुठेच दिसती नाही ग मला असं वाटतं हे मायेचा सॉफ्टवेअर जरा हार्ड झालाय का ग   माया जमवण्यात गाड झाले का ग*? 
------------------------------------

*वयाच्या तिसाव्या वर्षी भगवान महावीरांनी आपल्या राजपटावर पाणी सोडलं आणि  आत्म *कल्याणासाठी जन कल्याणासाठी बारा वर्षे सहा महिने पंधरा दिवस वनामध्ये भ्रमंती करून मौन साधना करून फक्त आत्मसात करण्याचं काम केलं* .आपण म्हणू भगवान महावीर हे देव होते. आपण  माणस आहोत. 
माणसाला देव पण असं एकदम येत नसतं. कानातले ठोकलेले खिळे काढताना अनंत वेदना झाल्यानंतरही अगदी स्थितप्रज्ञ असणाऱ्या भगवान महावीरांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्या श्रावकाने त्याला विचारलं मी तो खूप काळजीपूर्वक खिळे काढले आहेत आपल्या डोळ्यात अश्रू का तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर त्यांना भगवान बनवतो कर्माची परतफेड करताना  तो  ग्वाला हे सगळं कसं सहन करेल या चिंतेने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले या विचाराने व आचरण ते भगवान झाले अगोदर ते महावीर होते परंतु तेव्हापासून त्यांना भगवान महावीर म्हणून संबोधले जाऊ लागलं. 
आजकाल समाजात पाहिल्यानंतर असं दिसतं की
आई-वडिलांमधील अबोला, भांडण, त्याचबरोबर दोघेही करिअर साठी, पैसे मिळवण्यासाठी त्यांचे बाहेर पडणं आणि त्यामुळे अनेक समस्यां निर्माण होतात. 
मुलांच्या अपेक्षा की आई बाबा आपल्या जवळ असायला हवेत त्यांचा सहवास महत्त्वाचा तेव्हा मुलं काय म्हणतात बघा. ..! 
आई बाबाs आई बाबाss
पैसे नको होsss तुमचा आम्हाs वेळ हवा वेळ हवा...!
खरं खोटं मुळीचs नको तुमच्यात आम्हासs मेळ हवा...!

आई बाबा आई बाबा आम्ही शिकत असलेले शाळेतील विषय दैनिक व्यवहार जाण्यास पुरतील का ?
जगणं आमचं सुखकर करण्यास हा अभ्यास कामी येईल का?
आई बाबाs आई बाबाssपैसे नको होsss तुमचा आम्हाs वेळ हवा मेळ हवा...!

आई बाबा आई बाबा अभ्यास म्हणजे घोकंपट्टी ही मलम पट्टी आमच्या विकासाची दारे उघडेल  का...?
आई बाबाs आई बाबाssपैसे नको होsss तुमचा आम्हाs वेळ हवा मेळ हवा...!

आई बाबाs आई बाबाss...! गट कार्याची गटचर्चेची जागा आता इव्हेंट मॅनेजमेंट घेतली ना..! गटकाम गटचर्चा न करता सामाजिक विचाराची क्षितिजे रुंदावतील का...?
आई बाबाs आई बाबाssपैसे नको होsss तुमचा आम्हाs वेळ हवा मेळ हवा...!

आई बाबाs आई बाबाss जबरदस्त अभ्यासक्रम जीवघेणी स्पर्धा 
कर्तुत्व आमचं घडवेल का...? 
स्वार्था पलीकडे जाऊन आम्हा संवेदनशील बनवेल का...? 
आई बाबाs आई बाबाssपैसे नको होsss तुमचा आम्हाs वेळ हवा मेळ हवा
खरं खोटं मुळीच नको तुमच्यात आम्हासs मेळ हवा...!

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड