गझल, वृत्तवीर लक्ष्मी, विषय -वाजता वाद टाळू जरा आपला दि. 7/5/2023
गझल
वृत्त -वीरलक्ष्मी
लगावली -गालगा गालगा गालगा
वाद टाळू जरा आपला
संपवू भांडण्याचा विषय
काल बघ शेवटी छेडला
मी तुला भेटण्याचा विषय
छेडणे टाळते रोज मी
मोरचे काढण्याचा विषय
शांत डोळे मला भावती
साधण्या सांधण्याचा विषय
प्रा सुरेखा कटारिया