भारतीय संस्कृती जैन धर्माचे योगदान- डॉ श्वेता

*अरिहंत जागृती मंच पुणे*

*भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्त खुली निबंध स्पर्धा*
*भारतीय संस्कृतीत जैन धर्माचे योगदान*

*लेखिका- डॉ.श्वेता निलेश राठोड* - वय 38

उद्योग नगर, आयकॉन पलाश रेसिडेन्सी,फ्लॅट नंबर 105, 
मो नंबर -9922054546

सोबत कितीही लोक असू द्या संघर्षात आपल्याला स्वतःलाच करावा लागतो... म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा...!! हा एका राजघराणा जन्मलेल्या व बारा वर्षे सहा महिने पंधरा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालून अनेक उपसर्गांना समर्थपणे संयमाने पेलणारे भगवान महावीरांच्या स्वभावातील समताधारी भाव त्यांचं जगणं अखिल मानव जातीसाठी फार महत्त्वाचं आहे. 
                 विश्वास असेल तर न बोलता ही सारे कांही समजून घेता येते... आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा विपरीत अर्थ घेतला जातो...!! भगवान महावीरांचा  अनेकांत वाद  हेच सांगून जातो. 

गरजा पूर्ण करायच्या असतील तर मेहनत करायला शिका...
गोंधळलेल्या अवस्थेत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवीत असेल तर तो असतो तुमचा ..अनुभव.
     माणसाला परके कोण? हे कळण्यापेक्षा आपले कोण? हे कळायला जास्त उशीर लागतो...उद्याचा जास्त विचार करायचा नसतो... करण जास्त विचार केला की आजचा दिवस सुद्धा नकोसा वाटतो..

 माणसाने माणुसकीने माणसाला घडवायला शिकावं... पूर्ण जग जिंकता येतं संस्काराने आणि जिंकलेले ही निघून जातं ते अहंकाराने हा मुलाचा संस्कार भारतीय संस्कृतीत रुजवण्याचं काम जैन धर्माने केले आहे. 

        पूर्वी स्त्रियांची खूप कुचंबना होत होती.स्त्रियांच्या पायात मणामणाच्या साखळ्या ठोकल्या जात असल्याने, समाजाचे अर्धांगच लुळे पांगळे झाले होते. एकीकडे वेदांमध्ये स्त्रीचा गृहलक्ष्मी, गृहसम्राज्ञ म्हणून गौरव होत होता; तर दुसरीकडे  वेदप्रामाण्य मानणारेच तिला पराश्रीत, अबला, उपेक्षित समजून हिनपणे वागत होते. 'सुगरिणी' ने  अन्न रांधावे आणि 'सुहासिनी' ने  मुला बाळांना जन्म द्यावा. एवढीच तिची कामगिरी..!
         भ.महावीरांच्या काळात दासदासींचे बाजार भरविले जात होती. या बाजारात निराश्री, बलात्कारीत, विधवा स्त्रिया पशु प्रमाणे विकल्या जात होत्या. जैन   आगम ग्रंथातील चंदलबालाची कथा खूप बोलकी आहे. 
कसलाही नातेसंबंध नसताना एक सत्शील राजकुमारीने जीवनात भोगलेल्या दुःखामुळे महावीरांना तिची कणव वाटली व या मुळे त्यांनी तिचा शिष्या म्हणून स्वीकार केला. एका अपहर्तेचा असा उद्धार केला. या चंदनबाला पुढे भगवान महावीरांच्या 36000 साध्वी असणाऱ्या या साध्वी  संघाच्या प्रमुखा झाल्या. अशा अपहृतेला जीवनात सुखाबरोबर पुन्हा प्रतिष्ठा लाभावी म्हणून या महापुरुषाने साध्वी संघाचे द्वारे तिच्यासाठी उघडली. ही मानवी जीवनाची सार्थकता नाही तर काय ...!भ. महावीरांनी त्या काळातील  दिन दुबळ्यांना सहृदयतेने कसा हात दिला. हे या ऐतिहासिक सत्य घटनेतून स्पष्ट होते.

विश्वाच्या प्रयोगशाळेतील महान वैज्ञानिक भ.महावीर बारा वर्ष सहा महिने पंधरा दिवस या प्रदीर्घ कालावधीत ते अधिक काळ निसर्गाच्या सानिध्यात राहिले होते.त्यामुळे जीवसृष्टीशी त्यांचा निकटचा संबंध आला.त्यातून त्यांनी जे निरीक्षण, परीक्षण केले या अभ्यासातून त्यांनी जे प्रबोधन केले ते आजच्या विज्ञान युगात ही आश्चर्यचकित करणारे आहे.
भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पती विषयक जे शोध लावले. त्याचे ही मूळ भ. महावीरांच्या पंचस्तिकाय मध्ये आढळते. भ. महावीरांनी पृथ्वी काय, जलकाय, तेजकाय,वायु काय व वनस्पती काय अशा पाच प्रकारच्या एकेंद्रयि जीवांना पंचास्तिकाय म्हटले आहे. 
       काय म्हणजे शरीरधारी.  अस्तिकाय  जीव म्हणजे दगड हिरा कोळसा सारखे पृथ्वीकाय किंवा मेघासारखे जलाकाय ज्योती धूप निखाऱ्यासारखे अग्नीकाय. महावायू, शीतवायू, उष्णवायु सारखे वायुकाय आणि चैतन रूप असणाऱ्या सर्व वनस्पती हे वनस्पतीकाय जीव...!दगड हा पृथ्वी काय जीव एकेंद्रिय असतो,हे विधान तसे आश्चर्यकारक वाटावे असेच काहीसे...!वनस्पतींना जीव असतो हा सिद्धांत भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वी जगाला दिला. ज्यावर फ्रेंच तत्त्वेता हेन्री वर्गसा यांचे वनस्पती शास्त्रातले काही सिद्धांत व डार्विनचा उत्क्रांतवाद  भ. महावीरांच्या विचारसरणीची आठवण करून देतो.  विश्वाचा प्रयोग शाळेतील  ते पहिले महान वैज्ञानिक कसे होते हे समजू शकते. हे कळते की भगवान महावीरच्या विचारसरणीची  तत्व प्रणाली अधिक प्रत्ययास येते. 
एकीकडे माणूस अंतराळातील दूरवरच्या विश्वावर गरुडझेप घेऊन स्वामित्व प्रस्थापित करण्याचा अविरत प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे स्वतःच्या विश्वातील नैसर्गिक साधन संपत्तीची घारझेप घेऊन अखंड उधळपट्टी करीत आहे. कंगाल होत आहे. अशा प्रकारच्या पर्यावरणाचा, नैसर्गिक साधन संपत्तीची उधळण थांबविण्या साठी, प्रदूषण रोखण्यासाठी भ. महावीरांच्या विचारधारेकडे नव्या उमेदीने नव्या उन्मेशाने बघितले पाहिजे. आता हे माणसाला जाणवू  लागले आहे. पशूंचे संरक्षण,संवर्धन व्हावे यासाठी तो प्रयत्न करू लागला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवली जावी असे त्याला वाटू लागले आहे. पाणी साठवा, पाणी जिरवा म्हणू लागला आहे. हे माणसाला आधीच कळायला हवे होते. 2600 वर्षांपूर्वी एका महामानवाला हे उमजले...!दगड- माती, तेल- पाणी, वाती-ज्योती, वारा-गारा, वनस्पती अशा पृथ्वीकाय, जल काय, अग्नीकाय, वायुकाय, वनस्पतीकाय या 'पंचास्तिकाय' त ऊर्जा असते,चैतन्य असते, जीव असतो, हे या महामानवाने प्रगल्भ बुद्धिमत्तेवर जगाला सांगितले. 
हिंसेला हिंसा हे उत्तर नसून अहिंसा हाच  हिंसेवरील  उतारा आहे .सत्य उमगण्यासाठी अनेकांत आवश्यक आहे. कर्म सिद्धांत भगवान महावीरांनी सांगितला. कर्मबंधाचा विळखा घट्ट न होऊ देता,त्याला प्रतिबंध करण्यासाठी कर्म सिद्धांत महत्त्वाचा...!बाभूळ पेरून आंबा कधीच येत नसतो. त्यासाठी आंबाच पेरायला हवा. जसे कराल तसेच भराल. हा कर्म सिद्धांत जगताना महत्त्वाचा
जैन धर्मातील 24 वी तीर्थंकर यांच्या या विचारधारेतून अनादी, अनंत काळापासून आलेल्या जैन धर्माने भारतीय संस्कृतीमध्ये मोलाची भर घालून संस्कार व संस्कृतीचे जतन करण्यासाठी सतत कार्यरत आहे.
.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड