पुस्तक कविता
कवी अनंत भावे यांनी लिहिलेली पुस्तकांचे महत्व अधोरेखित करणारी मला आवडलेली कविता जागतिक पुस्तक दिनानिमित्त-
हे नच पुस्तक
-----------------------
हे नच पुस्तक
ही तर खिडकी
जग भवतीचे बघण्यासाठी।
हे नच पुस्तक
ही तर दुर्बीण
अदृष्टाला भिडण्यासाठी ।
हे नच पुस्तक
हा परवाना
विश्वनागरिक होण्यासाठी।
हे नच पुस्तक
हा तर आरसा
स्वतःलाच ओळखण्यासाठी।
--------------------------
कवी अनंत भावे
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!