चिंतन संसारात असून विरक्त, अक्षय तृतीया
*आजचे चिंतन*
23/4/2023
*संसारात असून विरक्त...!*
22/4/2023
*प्रिय बंधू उमाकांत यांना सुरेखाचे अनेक आशीर्वाद*.
पत्रास कारण बाईचे वर्ष तप पारणे...!बाईच सलग सातत्यपूर्ण चाललेलं वर्ष तप व या अठरा वर्षे चाललेल्या तपाचं पारण कुठे करायचं विचारलं असता, बाई म्हणाली, "मला दुसरीकडे कुठे जायचे नाही. नगरी येथे परम पूज्य आचार्य आनंद ऋषीजी यांच्या पावन भूमीमध्ये करावयाचे आहे".
उमाकांत, रवींद्र भाऊ जाऊन आज पाच महिने होऊन गेले. त्याची खूप इच्छा होती बाईचं वर्ष तप पारन हस्तीनापुरला करायचे .त्याची ती इच्छा अपूर्ण राहिली. तसेच परततोंड बघितल्यानंतर सोन्याची सीडी करावयाची त्याची इच्छा होती. परंतु आयुष्य कर्मा पुढे कोणाचेच काही चालत नाही.असो....!
यावेळच्या पारण्याला त्याची उणीव आपणा सर्वांना सतत भासत आहे.
नुकतीच भिगवनहून आले आणि मनात अनेक विचारांच काहूर दाटलं.
बाईच्या वर्ष तपच 18 व पारण नगर येथे परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज साहेब, परमपूज्य डॉ अलोक ऋषीचे महाराज साहेब आदी ठाणा यांच्या सानिध्यात करण्याचे ठरले. त्यानिमित्ताने उमाकांत आपली *बाई पद्माबाई गौतमचंदजी रायसोनी यांच्या सहवासातील काही अनुभव कथन*...!
कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होतात... अगदी तसेच बाई तुझ्या सहवासात राहिल्यावर नकळत विचार देखील स्वच्छ संस्कारक्षम होऊन जातात...!!
आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो... खरी आपुलकी माया व प्रेम हे फार दुर्मिळ असतं... हे दान ज्याला लाभलं, त्यालाच त्यातला खरा आनंद उपभोगता येतो. बाई हे तू तुझ्या कृतीतून आम्हा सर्वांना दाखवून दिल. रवींद्र भाऊ गेल्यानंतर अधिकच संसारातून विरक्त झालेली बाई आत्म कल्याणाच्या साधनेत रंगून गेली. या आत्मसाधनेला सहाय्य करणाऱ्या तिच्या दोन्ही सुना बसंती व शैला नात सुना प्रिया, प्रतीक्षा, सलोनी या खूप महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. पण तरीसुद्धा रवींद्र भाऊ गेल्याचा सोस माऊलीला उरी घाव करून गेला. या मोठ्या धक्क्यातून तिला बाहेर काढणं आपणा सर्वांचं खूप मोठं कर्तव्य असून ते आपण मोठ्या कसरतीन पार पाडत आहोत.
. *विचारवंत होऊ नका आचारवंत व्हा..*!!
बाईचं साधं राहणं. साधेपणा हे सगळ्यात उत्तम सौंदर्य आहे..
उमाकांत क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे... हे बाईनं आपणास तिच्या कृतीतून दाखवून दिलं.
विनम्रता हा सगळ्यात आपुलकी आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. समभाव राहून आम्हाला संस्काराचे संस्करण दिलं.
माणूस समजून घेणं कठीण असतं तेंव्हा परिस्थिती समजून घ्यावी..हे तुच तुझ्या आचरणातून दाखवलं.
तिच प्रत्येकाशी प्रेमाने वागणं बरच काही सांगून जातं. आनंद, प्रफुल, डॉ.प्रसन्न ,पूर्वा , नातवंड सिया, आलोक, राधा या परतोंडांना, आपल्या कृतीतूनच तू शिकवण दिली, " *पोरांनो, इतके लहान व्हा की प्रत्येकाला जण तुमच्याबरोबर बसू शकेल.... इतके मोठे व्हा की जेंव्हा तुम्ही उभे राहाल तेंव्हा कोणीच बसलेला नसेल..!!*"
घाई एवढी पण नसावी की जगायचं राहून जाईल... आणि उशीर पण एवढा नको की इच्छा अपूर्ण राहील. गेली 18 वर्ष चाललेलं आदरणीय बाईचं वर्ष तप आम्हाला खूप काही सांगत . सुख समृद्धीने घर भरलेला असताना जिभेवर ताबा ठेवून, वर्ष तप करून, संसारात राहूनही विरक्त जीवन कसं जगावं हे तुझं जगणं सांगून जात. स्वर्गीय रवींद्रभाऊ गेल्यापासून अधिकच विरक्तपणा तुझ्या मध्ये दिसून येतो. भगवान महावीरांनी दिलेला संदेश तू आचरणात आणताना आम्हाला सुद्धा तुझ्याकडे, तुझ्या आचरणाकडे पाहून तसं जगण्याची उर्मी येते.
तू नेहमी कृतीतून सांगत आली आहेस.रस्त्यावर पडलेल्या वाळलेल्या पानावर हळुवारपणे चाला.... कारण ती...तीच पाने आहेत, ज्या झाडाच्या आश्रयाने तुम्ही मोठे झालेले आहात.
. आवडतं ते करू नका... जे करावंच लागतं त्यात आवड निर्माण करा.
जमा करून ठेवायचे असेल तर लोकांचे आशीर्वाद जमा करा.. कोणाचा तळतळाट नको... असे संस्कार बाईंन आपल्यावर केले. आणि रवींद्र भाऊ त्या संस्काराचे बीजारोपण करून पुढील पिढीला कार्य करण्यास प्रवृत्त करून निघून गेला. तो आज आपल्यात नाही. तरीसुद्धा त्यांनी केलेलं कार्य आपण बहीण, भाऊ नातू पणंतू असेच पुढे चालत ठेवू. तुझं समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणे आम्हाला खूप काही शिकवून जातं. करण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. उमाकांत बाई आपल्याला नेहमी सांगते जीवनात फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवा ...*मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा*! *समभाव ठेवून जगा*
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायमच आठवणीत असतात... बाई अगदी तुझ्यासारखं... स्वर्गीय रवींद्र भाऊ सारखे संस्कारक्षम.!
*अक्षय तृतीयाच्या वर्ष तप पारण्याच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. .!*
उमाकांत थांबते मनात खूप विचारांच मोहळ दाटून आला आहे. परंतु...!
असो आपलेच
👏🪷🪷🪷🪷🪷🪷👏
*बसंती, सुरेखा, प्रकाश, बेबी, दिलीप शैला व सर्व नातसूना, नातू ,परतोंड*