चिंतन नाती उजागर करूया होळीनिमित्त

*चिंतन* 
*नाती उजागर करूया* 
*दि. 7/3/2023*


*होळी ,धुळवड आली की मला ही गुलज़ार कवींची कविता  आठवते*.

*-कभी तानों में कटेगी,*
*कभी तारीफों में;*
*ये जिंदगी है यारों,*
*पल पल घटेगी !!*

*-पाने को कुछ नहीं,*
*ले जाने को कुछ नहीं;*
*फिर भी क्यों चिंता करते हो,*
*इससे सिर्फ खूबसूरती घटेगी,*
*ये जिंदगी है यारों पल-पल घटेगी!*
*बार बार रफू करता रहता हूँ,*
*..जिन्दगी की जेब !!*
*कम्बखत फिर भी,*
*निकल जाते हैं...,*
*खुशियों के कुछ लम्हें !!*
*-ज़िन्दगी में सारा झगड़ा ही...*
*ख़्वाहिशों का है !!*
*ना तो किसी को गम चाहिए,*
*ना ही किसी को कम चाहिए !!*
*-खटखटाते रहिए दरवाजा...,*
*एक दूसरे के मन का;*
*मुलाकातें ना सही,*
*आहटें आती रहनी चाहिए !!*
*-उड़ जाएंगे एक दिन ...,*
*तस्वीर से रंगों की तरह !*
*हम वक्त की टहनी पर...*,
*बेठे हैं परिंदों की तरह !!*
*-बोली बता देती है,इंसान कैसा है!*
*बहस बता देती है, ज्ञान कैसा है!*
*घमण्ड बता देता है, कितना पैसा है।*
*संस्कार बता देते है, परिवार कैसा है !!*
*-ना राज़* *है... "ज़िन्दगी",*
*ना नाराज़ है... "ज़िन्दगी";*
*बस जो है, वो आज है, ज़िन्दगी!*
*-जीवन की किताबों पर,*
*बेशक नया कवर चढ़ाइये;*
*पर...बिखरे पन्नों को,*
*पहले प्यार से चिपकाइये !!*
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य, आणि आळस यांचे दहन करून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी आळस झटकून सतत सतर्क   राहणे महत्त्वाचे. हरवत चाललेली नाती सांभाळण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा. .!तो संवाद  सुसंवाद कसा होईल याचे चिंतन करण  महत्त्वाचं. ..!! नात्याना नेहमी बोलकं  ठेवण्यासाठी सतर्क राहणं महत्त्वाचं... संवाद न साधल्यामुळे अधिक गैरसमज  होतात.. मग नातं कुठलंही असो. .! या नात्यांना उजागर करण्यासाठी  होळी, धुळवड यासारखे सण...!झालं गेलं विसरून नव्याने जीवन जगण्याची उभारी देण्याचा संदेश  देतात. 
अहंकाराने बऱ्यापैकी उंची असलेली माणसे सुद्धा बुटकी वाटू लागतात. विनयानं माणसं मोठी होतात सुसंवादान सकारात्मक दृष्टिकोनान माणसांची नाती उजळून निघतात. 

अनेक माणसे अनुभवली आहेत. माणसं कपडे बदलतात, घरे बदलतात, राहणीमान बदलतात, मित्र बदलतात, नाते सुद्धा बदलतात.... तरीपण खूप अस्वस्थ दिसतात.. हे असं का होतं. हा माझ्या मनाला पडणारा प्रश्न मला सतत सतावत असतो. 
    जेव्हा मी मनाला माझ्या प्रश्न विचारते. तेव्हा मनाच्या अंतर्गाभ्यातून उत्तर येतं. सुरेखा माणसं सगळं बदलतात परंतु  ते स्वतः  बदलण्यास  तयार नसतात. तर चला आनंदी जीवन जगण्यासाठी होळीच्या पवित्र अग्नीत राग द्वेष लोभ मोह माया याचबरोबर  चिंता व दुःखं जळून ... व होळीच्या प्रकाशात जीवन  उजळून निघो.
*होळी फाल्गुनी चौमासी पक्खि संबंधित क्षमा याचना व  हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन*🌷😊🌷
*प्रा सुरेखा प्रा प्रकाश एवम समस्त कटारिया परिवार रांजणगाव गणपती*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड