मानवतेचे मंदिर आनंदवन चिंतन
आजचे चिंतन
31/1/2023, बुधवार
*मानवतेचं मंदिर- आनंदवन*
माणुसकीचा वारसा घेऊन आलेले व तो जपत असणारे विकास भाऊ आमटे आपणास सुरेखाचा सविनय नमस्कार
अनेक वर्षाच्या इच्छेनंतर काल आनंद वनामध्ये जाण्याचा योग आला.बाबा आमटे ,प्रकाश आमटे, विकास आमटे यांच्या जीवनाचा चित्रपट पुस्तकातून वाचला होता. अभ्यासला होता. परंतु आज *प्रत्यक्ष आनंद वनाला भेट देऊन खरोखरच मानवतेचे मंदिर पाहून आनंद द्विगुणीत झाला राजेश भाऊने खूप माहिती छान दिली दामिनीने प्रत्येक प्रत्यक्ष प्रकल्प दाखवून आनंदवन पाहण्याची आमची उत्सुकता शिगेस पोचवली*
कडकपणा येण्यासाठी चटके सोसावेच लागतात मग ते कपडे इस्त्रीचे असो किंवा चहा असो किंवा आयुष्य असो. चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही.... हे सारं काही आनंदवनामध्ये प्रकर्षानं जाणवलं.
'रुद्राक्ष' असो की 'माणूस'... आवघड आहे तो "एकमुखी" भेटणं..!!
एकटेपणा असतो तेंव्हा डोळ्यातून अश्रू कमी येतात, मनातून जास्त... रडू येतं.
परमेश्वर हा अत्यंत कृपाळूच आहे... फक्त अत्यंत शुद्ध अंत:करणाने जो त्याची मदत मागतो. त्याला ती निश्चितपणे मिळत असते. कुष्ठरोगी,दिव्यांगी अनेक समस्या ग्रस्त झालेल्या मानवी मनाला आनंदाने जगण्यासाठी केलेला भूतलावरील स्वर्ग म्हणजे आनंदवन...!
आनंद वनात गेल्यानंतर असं वाटलं धर्म म्हणजे मानवी विकासाच्या अंतःकरणाचे फळ आहे, यासाठी धर्माचा आधार म्हणजे एखादा ग्रंथ नसून आनंद वनातील कार्यकर्तृत्व मानवी अंत:करणचा ठाव रुजवण्याचं काम करत आहे.
अनेकांच्या अनेक समस्या हाताळण्याचे कौशल्य ज्याच्या जवळ असते तोच आपले स्वतःचे व इतरांचे जीवन सार्थकी लावतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदवन होय..!!
कमळाकडून शिकावे चिखलात उगऊन सुद्धा आपले अस्तित्व टिकवावे लागते... तसेच चांगले घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते. याचे प्रात्यक्षिक म्हणजे आनंदवन. ..!
या निमित्ताने डॉक्टर भारतीताई आमटे यांच्याशी संवाद साधता आला.मनातील सद्भाव स्थानापन्न झाले की ईश्वराचे दर्शन होते. भारत जोडो अभियानाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा खूप मोठा संदेश आपण जाजल्यवृत्तिने जागृत ठेवला. गाडगे बाबांनी सांगितलेला संदेश...! *देव माणसात आहे* *देवळात नाही*. आणि माणसात देव शोधणाऱ्या या आनंदवनाच्या मानव मंदिरात आम्हास खूप समाधान आणि आनंद मिळाला!!
तेथील सारं काही पाहत असताना परिवारातील स्वार्थाने बरबटलेल्या नात्यात अडकून निराश राहण्यापेक्षा जनसमुदायात राहुन आनंदी राहण्यात मोठ्या पुण्यकर्माचा बंध आहे. मनाला उभारी देणार हे आनंदवन...!
.*स्वतःशी प्रामाणिक रहा ..लोकाचं काय...?*
. "त्रास असताना ही सकारात्मक राहणं...संपत्ती असूनही निगर्वी, सरळ राहणं..राग आल्यावर ही संयम ठेवणं .. अधिकार असून ही विनयशील राहणं....यालाच आनंदी जीवन म्हणतात.!! हेच आम्हाला आमटे कुटुंबियांमध्ये पाहायला मिळाले.
जीवनात कितीही कमावून ठेवले तरी बाकी शून्यच राहते... आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माने साठवलेले पुण्यच...!!
जगण्याचा दर्जा आपल्या परिस्थितीवर अवलंबून नसतो तर तो फक्त आपल्या विचारावर अवलंबून असतो. आनंदवनातील आनंददायी सत्कृत्यानं आमचा आनंद द्विगुणीत झाला.
*प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी आनंदवनाला भेट देऊन यालाच जीवन ऐसे नाव याची अनुभूती घ्यावी*.
आपली भगिनी प्राध्यापिका सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे ते 33