मला भावलेले शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा 
2.शाईस्तेखानाची बोटे 
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती"करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावूनजगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...!
6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्यारात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे  चिकीत्सक राजे"
खऱ्या अर्थाने ते "लोकराजे" होते

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड