दीपोत्सव कविता

दीप उत्सव

बहरून आली सारी पाने
शहारुनी गेली मने वने
सुजान मानव गीत गातो
आनंदी दीपावली चे गाणे 
पल्लवू लागे ज्ञानपालवी
भव्य दिव्य कठोर तपाने

आकाशी दीप सप्तरंग दावीत 
झाडवेलींना फुटले हे धुमारे
दिव्या सोबत येता  जरी वारे    
 अंधारात चमकले तेजस्वी तारे
प्रगटले आत्मभानाचे स्वशिल्प
दीपावलीतील हे मौतिक दाणे


महावीरांचे निरामय  जीवन
समाप्त झाला राग द्वेष  लोभ
गौतम केवलज्ञानी महावीरस्वामी निर्वाणवाणी न उरे क्षोभ
क्षोभ संपता अज्ञाना कडून
तिमिराकडे गाती नवे तराणे

Katariyasurekha@

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड