समाज रत्न पुरस्कार

आजचे चिंतन
31/1/2023
कमावली का माणस ...? 

आज  चंद्रपूर जिल्हातील भद्रावती मंदिराच्या आवारात आहोत. प्राध्यापक प्रकाश कटारीयांचा आज वाढदिवस  पार्श्वनाथाच्या मंदिरात देवदर्शनाने साजरा केला. सोबत दिलीपजी, उज्ज्वलाजी भटेवरा व मी अशी कसली ही अपेक्षा न ठेवता मनापासून प्रेम करणारी मानस जवळ होती. 
वयाच्या 66 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रकाशजीना  चंद्रपूर येथील ताडोबा जंगलात जाताना काही प्रश्न त्याच्या मेव्हणीने विचारले. 
उज्ज्वला -बेनोजी मी तुम्हाला गेले ४3 वर्षे झाले  पहाते. तुमच्या वर अनेक उपसर्ग आले पण तुम्ही कधी व्हायबल झालेले मी पाहिले नाहीत. राग राग केला नाही.माणसं तोडली नाहीत? 

प्रकाश- जेंव्हा मेहनत करून सुद्धा हेतू साध्य होत नाही. तेंव्हा रस्ता बदलणे.अनेक समस्या शांत राहून सोडवता येतात. त्याला वेळ द्यावा लागतो. 
 आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तू पेक्षा स्व -भावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात. जे तुम्हा सारखे  माझ्याबरोबर आहेत. 
. यशस्वी होण्याच्या मार्गाचे पहिले पाऊल म्हणजे *प्रबळ इच्छा शक्ती व मनापासून केलेली कृती करण महत्वाच. .!*
*झाड नेहमी पाने बदलते मुळ्या नाही*.
 माझी पत्नी नेहमी सांगत असते जगताना दोनच गोष्टी जास्त संयमी बनवतात. एक वाचलेली  पुस्तके व जीवनात भेटलेली  माणसे. वाचता आलीच पाहीजे. 

*उज्ज्वला-तुम्हाला पडलं की झोप लागते. घोरण सुरू होत. आमची ताई म्हणते बघ बेबी संगीत संध्या सुरू  झाली...! याच राज काय*❓

प्रकाश-जीवन जगताना आपल्या मनात अनेक विचार अविरत चालू आसतात. मना विरुद्ध घडत. त्यामुळे  मनात जास्त निगेटिव्ह विचार चालू असतात...
खुप आठवणी जाग्या करतो. त्या  तुमच्या चुकाची जाणीव करून देत असतात...
 डोळ्यासमोर येतात जे तुम्हाला दिवसभर भेटलेले  तुम्ही त्यांना कांहीतरी बोललात किंवा ते तूम्हाला कांहीतरी बोलले . 
हे नॉर्मल आहे.... पण या गोष्टी फार वेळ तुम्हाला झोप येऊ देत नाहीत... *तर मग तुम्हाला स्वतःलाच समजाऊन सांगावे लागेल... आणि तो विचार थांबवावा लागेल..ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या होऊन गेल्या... बाकी जे कांही असेल उद्या*...! *रात गयी बात गयी नवीन काम हाती घेणे व कार्यरत रहातो. भूतकाळाचा फारसा विचार न करता वर्तमानात जगतो* . 

*दिलीपजी- तुमच्या बरोबरचा आमचा जवळ जवळ 50 वर्षाचा सहजीवनाचा सहप्रवास...!आपण प्रंचड माणस जोडली. तुमच्या सान्निध्यात आलेला माणूस आपण जोडला.तोडला नाही. माणस जोडण्याच्या कलेबद्दल सांगाल?* 

प्रकाश-   मोडतोड करायला ज्ञान लागत नाही... पण तडजोड करायला खूप शहाणपणा नक्कीच लागत. हे शहाणपण येण्यासाठी पुस्तकांबरोबर माणसं वाचली पाहीजे. त्यांची परीस्थिती, मनस्थिती जाणली पाहीजे. हे आई वडिलांचे संस्कार व सुरेखाच्या सहवासाने आत्मसात करत गेलो. 
मनातील विचार,चेहरा सांगतो.
मनातील विचार चेहर्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारावर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो आणि  प्रेम  असेल तर चेहरा सात्विक दिसतो.
*प्रत्येक झाडांनी फळे द्यावीच असे कांही नाही... कांही झाडाची सावली सुद्धा खूप कांही देऊन जाते. रोज कोणाच्यातरी आनंदाचे कारण बना कारण दुःख तर  आयुष्यात असतेच*!!!

*उज्ज्वला -बेनोजी शेवटचा प्रश्न आज तुमचा 66 वा वाढदिवस आपण चंद्रपूर जवळ असणाऱ्या ताडोबा जंगलात आहोत. आपण आपल्या स्नेही जणाना काय संदेश द्याल?*
प्रकाश- मा.प्रकाश, मा. विकास  आमटे वाघ,सिंहासारख्या हिंस्र प्राण्याना प्रेमानं आपलेस करतात. आपण तर मानस आहोत...! 
नमस्कारात मोठा चमत्कार आसतो. नमस्कारात प्रेम,  विनय, अनुशासन, नम्रता, आदर भाव जपला जातो.
नमस्कार मनात सत् विचाराची पेरणी करतो. क्रोध नष्ट करतो. अहंकार  झाडतो. आदर राखतो. अश्रू पुसण्याचे काम करतो. 

*आपली संस्कृती आहे .या संस्कृतीचे जतन करा. वाढदिवस अविस्मरणीय केल्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन.. 🙏*
*सर्वाना माझा स्नेह पूर्ण नमस्कार*🙏🙏🙏

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड