प्रजासत्ताक दिनाची 74 वर्ष चिंतन

आजचे चिंतन
26/1/2023
*प्रजासत्ताक दिनाची 74 वर्ष*
 
आज ७४वा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनानिमित्त किडस स्टारच्या पालकांना व  युवकांना सांगू इच्छिते, 
आमचं ध्येय आहे प्रत्येकाचा आत्मविश्वास द्विगुणित करणे. विद्यार्थ्यांच्या समक्षमतेचं सामर्थ्य जागृत करणं आणि कृतीतून शिक्षण घेणं. आणि देणं हे फार महत्त्वाचं आहे.
मुलाला विचारलं रेडिओ आणि टीव्ही मधला फरक काय 
एका चुणचणीत मुलानं सांगितलं जेव्हा माझे आई-बाबा घरात भांडत असतात आवाज ऐकू येतो. तेव्हा ते रेडिओ असतात. आणि ते भांडण  करता करता जेव्हा बाहेर येतात तेव्हा तो टीव्ही असतो. म्हणजे कृती हीच विद्यार्थ्यांना शिकवत असते.  आपण नेमकं काय करतोय? याचाही विचार करायला हवा. आपण जसं पेरू तसंच उगवेल. 
संस्कार संस्कारीत करण्याचं  काम आमचा स्टाफ करत असतो. सुंदर घडण आणि घडविणे त्यामुळे शक्य होत. 
 तुम्हा सर्वांना ठाऊक आहे *प्रतिकूलता असून सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चाफेकर बंधू अशा अनेक स्वातंत्र्य वीरांच्या अथक प्रयत्नाने मिळालेले हे स्वातंत्र्य...*!  आणि आज आपण प्रजासत्ताक दिन साजरे करत असताना पुढच्या पिढीला त्याची जाण देऊन मुलांचं आयुष्य अनेक वाटांनी बहरण्यासाठी कीडस्टार काम करत आहे. 
आज तुम्ही आम्ही स्वतःला तपासून पाहणे गरजेचे आहे. आपली पुढची पिढी काय करत आहे? काय वाचत आहे? त्यांच्या निष्ठा कोणकोणत्या? सुख-दुःखाच्या,श्रीमंत -गरिबाच्या कल्पना कोणत्या या सर्व गोष्टी वेळेत वेळ काढून तपासून बघणं आवश्यक आहे. सार जग म्हणजे एक पिकनिक पॉईंट, मोजमाजा एवढेच मनात ठेवून खाणं चटकदार ते ही पोषणमूल्यरहित ना जेवणाच्या पानात, ना वाचनात,ना जगण्यात मग या *संगणकाच्या जगात डॉलरबाज पिढी आयुष्याच्या निर्णायक क्षणी दुबळी होईल की काय असा प्रश्न निर्माण होतो?* म्हणून कीडस्टार मध्ये पालकांसाठी बालकांसाठी अभिरुचीच्या तरलतेची, ललित कलांच्या आस्वादांची, अभिव्यक्तींची ,परस्परांच्या प्रगाढ प्रीतीची,विश्वासाची बिजे इथे पेरली जातात. 
 एकूण परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं प्रसारमाध्यम, शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था या सर्वांनी आपली कूस बदलून खडबडून जाग व्हायला हवं. 
 
आजच्या या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन करून एवढेच सांगू इच्छिते. 

*असा आहे भारताचा इतिहास कधीच नाही पावणार र्हास जोपर्यंत असतील आकाशात चंद्र आणि तारे* 
*इतिहासाला, भूतकाळाला साक्षीदार असतील सारे*

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33

भारत माता की जय

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड