आदर्श माता तेजीबाई खाटेर करमाळा
*स्वानंदी आदर्श माता- तेजीबाई खाटेर असामान्य व्यक्तिमत्व*
दि. 12/11/2022
*श्रेणिक व सर्व खाटेर परिवार व सेठिया या परिवार यांना सुरेखा कटारियाचा जय जिनेन्द्र*
मामीजीची वार्ता समजली आणि त्यांचा समताधारी जगण्याचा सारा जीवनपट अगदी चित्रपटासारखा झरझर डोळ्यासमोर तरळून गेला.
त्या गतस्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌷
*श्रेणिक म्हणाला, बाईला दिव्याची वात उंच कर.मला अभ्यास करायचाय.तोच श्रेणीचे भावसा म्हणाले, आपल्या पत्नीला मला झोपायचंय दिव्याची वात कमी कर. माऊली दिव्याची वात वाढवत राहिली. कमी करत राहिली. आणि दिव्यासारखी जळत राहिली. मुलांना प्रकाश देत राहिली ती माऊली तेजीबाई खाटेर*
करमाळा निवासी कार्यकर्तृत्व बंधू श्रेणिक शांत चित्ती सुरेखाताई, दिवंगत शारदाताई, लताताई, शकुंतला, शशिकला व सीमा स्नुषा संगीता आपणा सर्वांना हा मातृत्वाचा विरह सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो.
आत्ताच आमच्या मामीनी इहलोकांची यात्रा पूर्ण केली. वाडे बोलायच्या प्रसिद्ध धार्मिक वृत्तीच्या सेटिया परिवारातून कर्जत कोरेगाव निवासी मानवता जपणाऱ्या खाटेर परिवारामध्ये पणजीमामाजी यांच्याशी परीणय बंधनात बांधल्या गेलात. दिसायला सुंदर, हुशार, समय सूचक असणाऱ्या मामीजींनी आपल्या जीवनाला तपस्या, ज्ञान, धर्म, परोपकार, करून जीवनाचे सार्थक केलं.
हे करत असताना आजूबाजूला प्रतिकुल परिस्थिती असताना सहा मुली व त्यानंतर झालेला सातवा मुलगा श्रेणिक...! नावाप्रमाणेच काम करणारा. ..!!
जवळजवळ साठ
वर्षांपूर्वीची घटना त्यावेळी समाजाची विचार धाटणी पुरोगामी विचारांची..!त्या सर्व परिस्थितीवर मात करून आमच्या मामींनी एक सुंदर असा संदेश आपल्या जगण्यातून समाजापुढे ठेवला आहे. आमचे मामाजी पणजीलालजी त्यांच्या तपस्वी व कडक, शिस्तबद्ध स्वभावामुळे अगदी सोशिकतेने सारं समभाव ठेवत जीवन जगल्या.अगदी जीवनभर कर्तव्यनिष्ठ राहून सेवाच करत राहिल्या .मुलींना मुलाला उच्चशिक्षित करून धार्मिकतेचे धडे आपण दिले. सुखलालजी खाटेर यांच्या सुनबाई म्हणून आपण नवल भाऊंच्या नावलौकिकत भर टाकली .मित भाषी मामीजी प्रमाणेच त्यांचा सारा परिवार तसाच आहे. नगरसेविका सुनबाई संगीता ,नातू, पड नातू, जावई असा हा गोकुळासारखा परिवार आपण दिलेल्या संस्कार शिदोरीवर समाजामध्ये कार्य करत आहे.
आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली
*सुरेखा प्रकाशजी कटारिया राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली एवं स्वानंद महिला संस्था*