आजचे चिंतन- नशीब

आजचे चिंतन
25/1/2023
      शुभ प्रभात
स्वानंद सख्यांनो, नमस्कार

जोपर्यंत तुमची गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो... एकदा का तुमची गरज संपली की मग निंदेचा प्रसार  साजरा केला जातो. म्हणून आपलं काम थांबवायचं नसतं. आपलं चांगलं काम पुढे रेटायचं असतं नदीसारखं अखंड प्रवाहित राहायचं असतं. ही तर कामाची खरी पावती असते. 
साध्या सरळ माणसाचा कधीही कोणताच ब्रँड नसतो... *खरंतर साधी माणसं माणुसकीचा खरा ब्रँड असतात..!!*
 नशीब आकाशातून पडत नाही की जमिनीतून उगवत नाही.. नशीब आपोआप निर्माण होत नाही... तर माणूसच स्वतःचे नशीब आपल्या हाताने स्वतःच घडवत असतो, पुरुषार्थ करा.नशिबात असेल तसेच घडेल अशा भ्रमात मुळीच राहू नका.. कारण आपण जे पेरू तेच उगवत असत.तेच नशीब घडवत असतं.. हे लक्षात ठेवा.
काळजी त्याच लोकांची करायची जे तुमचा आदर कदर करतात
ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे.त्यालाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते..‌ बाकीच्यांना तुम्ही फक्त नशीबवान वाटता.
. प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहून कांही फायदा होणार नसतो...
विचार शुभ ठेवा.  आचार निर्मळ ठेवा. कोणाबद्दल ईर्षा भाव न ठेवता समताधारी राहिल्यास लाभच लाभ होईल.... भावे भावना भावीये भावी तीजे ज्ञान 
धन्यवाद🙏

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड