वर्तमान मे वर्धमान व्याख्यान
२
*पारिजातकाच्या बीजान
*तद्वत भगवान महावीरांनी राज पदाचा त्याग करून ज्ञानार्जनासाठी सज्ज झाले एवढेच नव्हे तर ज्ञानार्जन केल्यानंतर त्याचा सार त्यांनी काढला *जिओ जीवस्य जीवनम् याला अहिंसा ,सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या तत्त्वांची जोड दिली*
व स्वतःला समाजाच्या आत्म कल्याणासाठी वाहून घेतले.
आजच्या एकविसाव्या शतकातील संगणकाच्या फास्ट जीवघेण्या स्पर्धेच्या युगात, सुपरफास्ट युगात दहशतवाद, हिंसाचारात भगवान महावीरांचा मानवाला विसर पडला आहे की काय असे वाटते?
*जागोजागी वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.
*आई शोध शोधत तुला कुठे सापडत नाही तु मला*
*त्रीशला माता गर्भावस्थेत असताना ती जगात ज्ञानी बाल वर्धमानने आईला होणारा त्रास विचारात घेऊन गरभा मध्ये आपली हालचाल बंद केली होती.*
सध्याच्या कोरोना महामारी तील परिस्थिती पाहता खरोखरच *वर्धमान की वर्तमान मे बहुत जरुरी है ऐसा लगता है* l
*26 शे वर्षा पूर्वी भगवान महावीरानी दिलेला अहिंसेचा संदेश, सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जगाला दिला. तर महात्मा गांधींनी अहिंसेच्या तत्वांने देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले. तर सध्या अण्णा हजारे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारून अहिंसा मार्गानेच लोकपाल बिल पास करून घेतले*.
आज नितांत गरज आहे ती भगवान महावीरांच्या तत्त्वांच्या विचारांची व विचारानुसार आचाराची संपूर्ण भारतालाच नव्हे; तर जगाला ललामभूत ठरलेल्या या वंद्य पुरुषांच्या जयंत्या मयंत्या सर्वत्र आनंदाने थाटामाटाने साजऱ्या होणे आवश्यक आहे. त्यात किती प्रमाणात जागरूकतेने साजऱ्या केल्या जातात. त्यावरून त्या देशातील नागरिक किती प्रमाणात जागृत आहे. त्यांच्या तत्त्वाशी,अचारांशी, विचारांशी बांधील आहेत. राष्ट्रीय विकासासाठी एकदिल होऊन काम करत आहे हे सिद्ध होते.
कारण तो आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. तोच इतिहास भावी पिढीला आदर्श प्रेरणेचा स्त्रोत आहे. हे महत्त्वाचे...!
*अशा थोर विभूतींचे स्मरण म्हणजे राष्ट्राच स्मरण, राष्ट्राच्या दिव्य भव्य त्यागी वैरागी सहिष्णुतेच स्मरण, राष्ट्राच्या अस्मितेचे स्मरण, राष्ट्राच्या विजिगीषु विचारांचे स्मरण... आपणाला व्हायलाच हवे*.
*अशा उपक्रमातून समाज प्रबोधनातून होत राहो*