वेळेचे नियोजन गुलूगुलू बोलू चे निमंत्रण
*वेळेचे नियोजनात्मक निमंत्रण*
नमस्कार,
प्रा. सुरेखा , डॉश्वेताचा🙏
जीवनामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची असते. ज्याला वेळेचे गणित जमलं तो जीवनामध्ये सक्सेस झाला.हा आमचा अनुभव, अनेक सक्सेसफुल व्यक्तींचा अनुभव...!त्यांच्या जीवनात, यशस्वी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना उपलब्ध असणारा व त्या वेळेचे केलेलं त्यांनी नियोजन. ..!
जीवनामध्ये वेळ फार महत्त्वाची...!जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, तेव्हा योग्य वेळी योग्य गोष्टी करणं किती महत्त्वाचं असतं...!वेळ हळूहळू येते जेव्हा आपण तिची खूप उत्कंठेने वाट पाहत असतो. प्रियकराला प्रियसीची घ्यावी वाटणारी भेट. हे याचे उत्तम उदाहरण.
कधीकधी वेळ कसा जातो, हे लक्षात येत नाही म्हणजे आपल्या आवडीचे काम करत असताना वेळेचं केलेलं नियोजन खूप महत्त्वाचं असतं .
जेव्हा वेळ कमी असतो आणि ते काम करण्यासाठी कमी वेळात आपल्या कौशल्यानं ते काम पुर्ण करतो. तेव्हा तो वेगळाच आनंद असतो .वर्गात शिकवताना तास केव्हा संपून जातो हे कळत नाही. वेळेच भान राहात नाही.
जेव्हा वेळ जात नाही तेव्हा आपण उदास असतो .मनाला वेदना होतात. आपल्या प्रेमळ माणसाची सतत आठवण सतवते. त्याना केव्हा भेटू असं होतं.
प्रत्येक वेळी वेळ आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेनुसार सोयीनुसार येत नसते. म्हणून वेळोवेळी आनंदी राहण्यासाठी या कोरोनाच्या काळामध्ये मी प्रा. सुरेखा कटारिया व डॉ. श्वेता राठोड यांनी तीन पुस्तकांचे लिखाण केलं. आम्हाला सांगायला आनंद वाटतो .तो काळ तो, तो एकांत, ती वेळ आम्हा मायलेकींना चिंतनासाठी मंथनासाठी फार महत्त्वाची ठरली. म्हणूनच लहान मुले डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेल्या *लेखनरंग गुलुगुलु बोलू* हे पुस्तक पालकांना व बालकांना भेटीसाठी घेऊन येत आहोत.
या पुस्तकातील बालगीत लिटिल चॅम्पियन मधील बालचमुन् गायली आहेत.
या लिहिलेल्या बालकविता नाट्यछटा वाचून वेळोवेळी मला मार्गदर्शन करणारे शिक्षण तज्ञ स्वर्गीय वा न. अभ्यंकर, ज्येष्ठ साहित्यिक न म जोशी,डॉ.संगीता बर्वे, किरण केंद्रे, श्रीकांत चौगुले, विजया मारोतकर ,पद्मा हुशिंग आणि विशेष म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र संचालक मनोज देवळेकर व पुस्तक प्रकाशक कवी वादळकार राजेंद्र सोनवणे यांचे मनपूर्वक आम्ही दोघी मायलेकी ऋण निर्देश व्यक्त करतो .
लेखनरंग गुलूगुलू बोलू साहित्यकृती कोरोनाच्या काळातील निर्मिती आहे.याला आता मूर्त स्वरूप येत आहे. त्याचा प्रकाशन सोहळा दहा तारखेला आपल्या सर्व साहित्यिकांमध्ये, बालचमूच्या उपस्थिती मध्ये मध्ये करण्याचा मानस आहे. जरूर वेळेचे नियोजन करून कार्यक्रमास, वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
कारण आपणास ठाऊक आहे चांगली वेळ येण्यासाठी चांगली माणसं महत्त्वाची. .!चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येते. दहा तारीख, जुलै महिन्याची वेळ दुपारी तीन वाजताची राखून ठेवा.कारण वेळ निघून जाई पण आठवणी कायमस्वरूपी स्मरणाच्या अत्तर कुपीत राहती.
*स्थळ -ब्रह्मचैतन्य हॉल, रेल्वे* *ओव्हर ब्रिज जवळ, कटारिया होकेशनल सेंटर बिजलीनगर* *चिंचवड पुणे. दिनांक१०/७/२०२२ वार -रविवार*
*वेळ- दुपारी तीन वाजता*
धन्यवाद