अभिनव वाचन अनुभवकथन
*मातृभाषेवर शतदा प्रेम करावे*
----------------------------------------
27/2/2022
*नमस्कार मराठी भाषा दिन या मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
मराठी भाषा दिनानिमित्त अभिनव वाचन प्रकल्प *साहित्य परिषदेने* आयोजित केला. प्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन!
मला भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयातील माझा मराठीचा तास आठवला .आणि मी भूतकाळात केव्हा गेले ते माझे मलाच कळले नाही.
खरोखरच विद्यार्थ्यांना घडविताना मी घडत होते. माझा *विशेष मुख्य विषय अर्थशास्त्र व माझा आवडता विषय मराठी*
बालभारती, कुमार भारती, युवक भारती या पुस्तकात शब्दांचा लळा लागावा एवढी मोठी ताकत आहे . मराठी विषयांचे पुस्तके अनेक विविध विषयांच्या पुस्तकांच्या बेटावर नेणारे पुष्पक विमान म्हंटले तर वावगे ठरणार नाही
*माझे माहेर वाघदरा* ही कथा मुलांच्या गळी उतरवताना प्रत्यक्ष तो प्रसंग उभा करत असताना मुले ही अगदी जिवाचा कान करून ऐकत असत. *मानिनी* कथा सांगताना प्रत्येक प्रसंगाचा संवाद विद्यार्थ्यांकडून करवून घेताना. स्वाभिमानाने जगण्याची दुर्बिन जागृत होत असे. कारण शब्दात केवळ हसन हसवण नसून आंतरिक मनाचा वेध घेण्याची शक्ती शब्दांमुळेच कळते.
बुलेटीनच्या तासाला शाळेचे ग्रंथालय एका वाचन पेटीतून वर्गात येत असे. वर्गातल्या प्रत्येक मुलाला पुस्तक देऊन ते वाचायला प्रवृत्त करणे महत्त्वाचं...! त्यामुळे तो बुलेटीन चाऑफ तास ऑन होऊन जायचा. आणि म्हणूनच *भक्ती उपाध्याय, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखी मुले साहित्याकडे वळाली*. कारण या पुस्तकाच्या पेटीतून भारा भागवतांचा फास्टर फेणे भेटला.मुलांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, विवेकानंद ,सावित्रीबाई फुले, प्र के अत्रे,द मा मिरासदार, पु ल देशपांडे एक नव्हे अनेक प्रज्ञावंत साहित्यिक या साहित्य पेटीतून मुलांना भेटले आणि मुले घडली. ज्ञान सरिता वाहते त्या नदीमध्ये किती जणांनी काय घेतले हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न...?
मला आठवतंय वर्गात कविता शिकवताना ती लयबद्धता तिचा ताल सूर व कवितेचं गाणं म्हणत असताना कधी *हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करिती* हे सांगताना आमिषाला बळी न पडता स्वतंत्र बाण्याने जगा. तसेच *पाठीवरती हात ठेवुनी नुसते लढ म्हणा*. या अशा अनेक कविता शिकविताना मुलांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला दिसतो.
आज मातृ भाषेतील दिनानिमित्त सांगावसं वाटतं .मातृभाषेतून सतत संत साहित्याचे वाचन,श्रवण,लेखन हेच आपणाला समृद्ध करत असते.
*27 फेब्रुवारी हा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो*. मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा नेहमी अग्रह...! आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम यांची पीछेहाट होत असताना दिसते. इंग्रजी भाषेची महती जाणून आहोत. परंतु मातृभाषेला दूर लोटून फक्त मावशीच्या रूपामध्ये असणारी इंग्रजी भाषा फक्त तिची आणि तिची आराधना करणे म्हणजे भविष्यातील अनेक प्रश्नांना निमंत्रित करणे होय...! आपली प्रगती, क्रांती,विकास मायबोलीच्या किनाऱ्यावर पेरून होणारा जीवन विकास हा महत्त्वाचा...! *हा विकास म्हणजे विहिरीमधील जिवंत पाण्याचे न अटणारे झरे होय*. यासाठी मायबोली मातृभाषा महत्वाची असून तिचे जतन करणे व तिचा व्यवहारात सर्रास वापर करणे महत्वाचे! आजच्या या मराठी भाषा दिनी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🌅🌄✒️🗂️🚩
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33