रंग होळीचा
*रंग होळीचा*
१६/३/२०२२
-------------------------------------
रंग होळीचा
देहावरी तुझ्या बसला,
पाहून रूप,
हेवा मजसी वाटला
रंगीबेरंगी ती मुले,
राग द्वेशा विसरली
डोकावून मनात ती,
मनास हो चुंबीली
मन आपुले,
वसंतापरी भासले
होळीच्या रंगात,
रंगावे वाटले
पाण्यासम रूप तुझे,
रंगास भाळली
रंगाच्या नादात तू,
अहंकारास भूलली
किमया सारी होळीची
क्रोध भाव जाळी
स्वमध्ये जगण्याचा
टिळा लावते हो भाळी
सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33