*होळीची होलिका* १६/३/२०२२ राग द्वेष मत्सर भावनांची करू होळी कुविचारांची करू पेरणी सुविचारांची करू मलम पट्टी जखमांची.! बहरली रंगपंचमी निसर्गाची उधळण होते आहे सप्तरंगांची आठवे रंगपंचमी बालपणाची पाणी दुष्काळात सुकाळाची.! पाळी मोहरण्या गुलमोहराची फुलाफुलांतून रंग ओसडण्याची आस फुलपाखरा रंग खेळण्याची गोष्ट नव्हे फक्त ही रंगपंचमीची.! शिशिर जाऊनी वसंत बहरण्याची नाती नसतात केवळ रक्ताची प्रेम नाती उधळण रंगपंचमीची जणू पाण्यात रंग समर्पणाची.! होळी विकृतीची आणि विकारांची होळी अहंकाराची क्षमा याचेणेची जोडूनी ते कर समता राखण्याची होळी होलिकेला नमन करण्याची.! सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड