महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021*संभाषण कौशल्य व महिला सबलीकरण* ---------------+-------------*अनुभवांची अनुभूती*------------------------------*लेखिका-डॉ.श्वेता निलेश राठोड-कटारिया*------------------------------स्त्री ही सुखाचा सागर आहे,स्त्री ही जन्म माता आहे,प्रेमाचे आगर आहे,तिच्या हाती जगाची दोरी आहे,ती सोशिक आहे खरी ,जग उद्धारणारी आहे ,ती आता अबला नाही सबला आहे,ती ऊर्जेचा ,शक्तीचा स्त्रोत आहे....अशी आहे आजची स्त्री! तिच्याकडे पैसा आहे ,शिक्षण आहे ,उंच झेप घेण्याची क्षमता आहे. स्त्रीन सक्षम व्हावं म्हणून शिक्षण ,प्रशासन,राजकारण,समाजकारण या प्रत्येक पातळीवर मोठी झुंज देऊन बदल होतं आहेत. आणि हे महिला सबलीकरणा कडे उचलेले मोठे पाऊल आहे.स्त्रीला चार भिंतीत बंदिस्त करण्याचे प्रयत्न पुरातन काळापासून होत आले आहेत.काही ठिकाणी आज ही होत आहेत. आता काही प्रमाणात परिस्थिती बदलत आहे. कर्तृत्वाचे आकाश तिला खुणावत आहे,तिचे आत्मभान जागृत झाले आहे आणि तिचे समाजभान ही विस्तारले आहे .तिने मनात आणले तर ती संभाषण कले द्वारे जग जिंकू शकते.तिच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण करू शकेल. अशी तिला खात्री पटली आहे. हा माझा स्वतःचा ही अनुभव आहे संभाषण कौशल्याने आपण आपल्या भावना व विचार कधीही कोठेही आणि कोणासमोर ही प्रभावीपणे व्यक्त करू शकतो .भले ही मग ते एका व्यक्तीशी संभाषण असो ,कौटुंबिक असो,व्यावसायिक असो अथवा हजारोंच्या समोर वक्तव्य करायचे असो.खूप स्त्रियांकडे उत्कृष्ट मौल्यवान विचार असतात ,परंतु इतर लोक त्यांच्या विचारांना महत्व देत नाहीत. त्यांचा ठसा इतरांवर पडत नाही." हे का" ? संभाषण कौशल्य कमी असल्यामुळे,जेव्हा आपण समुहांमध्ये आपले विचार प्रकट करतो ,अनेकदा इतर लोक त्यांच्याकडे लक्ष देतं नाही लक्ष देणे टाळतात ;पण जेव्हा अन्य कोणी व्यक्ती तेच विचार मांडते तेव्हा त्यांचा उत्कृष्ट प्रभाव पडतो. महान वक्ता कार्नेगी म्हणतात,"यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये फरक असतो तो प्रभावशाली बोलण्यांच्या कलेचा! स्वतः ला योग्य प्रकारे व्यक्त करण्याच्या क्षमतेत जो न घाबरता ,न अडखळत आपले म्हणणे प्रकट करतो तोच स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवू शकतो."हीच गोष्ट जर प्रत्येक स्त्रीने आत्मसात केली तर नक्कीच कौटुंबिक, वैवाहिक,सामाजिक जीवनामध्ये ती आनंदी राहील.सासू सुनेचा संवांद असो किवा कोणत्या अधिकाऱ्यांबरोबर असो वां हाताखालच्या सहकर्यां बरोबर असो ....नक्कीच आपल्या संभाषण द्वारे लोकप्रिय होईल ,आपले स्वतःचे असे एक स्थान बनवेल. खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होईल. त्यासाठी स्त्रियांनी पुस्तके वाचण्या बरोबरचं माणसे ही वाचायला शिकली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात स्वतःची एक लायब्ररी असायला हवी. रोज नित्यनियमानं वाचन हवं. हे वाचत असताना घरातल्या लोकांबरोबर वाचलेलं शेअरिंग करायला हवं. आपण करत असलेल्या भाषणांमध्ये, व्याख्याना मध्ये तसेच गप्पा मारत असताना सुद्धा लेखकांच्या नावासहित त्यांनी मांडलेले विचार किती महत्त्वाचे आहेत. हे सांगता यायलाच हवे. हे फार महत्त्वाचा आहे.हे शेअरिंग करताना आपलं वाक्चातुर्य अधिक चांगल्या पद्धतीने निखरल जाईल. प्रभावी संवाद कौशल्यातून, आपण भाषण कलेच्या मार्गाने यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहू. त्यासाठी घरात स्वतःची, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची छोटी का होईना लायब्ररी हवी. घरात किती दागदागिने आहेत किती साड्या ,ड्रेस आहेत, यापेक्षा ही महत्त्वाचं म्हणजे स्वतःला, कुटुंबाला, देशाला समृद्ध करण्यासाठी घरात ग्रंथालय खूप महत्त्वाचे! एक गाव पुस्तकांचा होण्यापेक्षा प्रत्येक गावातील प्रत्येक घर हे ग्रंथालय होणं महत्त्वाचं ! स्त्रीला कौटुंबिक सुख हवे आहे,आयुष्यात स्वतः ची ओळख हवी आहे. आर्थिक सक्षमीकरणं हवं आहे ,आपली छाप इतरांवर पडायची आहे. असे वाटत असेल; तर संवादातून सुसंवाद होणं गरजेच आहे . जर स्त्रीनेच नव्हे तर सर्वांनीच आपले संवाद कौशल्य प्रभावी केल्यास आपण आपले संभाषण प्रभावी बनवू शकतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष बरोबर यश हमखास असेल .व खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण होत राहील. हा माझा विश्वास आहे. आत्तापर्यंत हजारोंच्या वर अशा पद्धतीने महिलांच्या विचारांचे परिवर्तन करून त्यांना सक्षम बनवण्याचे काम गेली पसतिस वर्षापासून सुरेखाताई कटारिया व मी करत आहे. *डॉ. श्वेता निलेश राठोड - कटारिया* *मो.न .9922054546*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड