माई ----------------------------- 7/1/2022 ----------------------------- सुरेखा कटारीया .चिंचवड.पुणे 33 माझ्या माईच्या मनात नाही क्रोधआणि मान समाजातली काढे घाण समाजसेवेच ठेवे भान घरच्यांनी कोंडला श्वास नवऱ्याने केला उपहास कुविचारा करूनी -हास हर मुखी भरवला घास चालवे सावित्रीचा वारसा तुझा कामावर हो भरोसा राजदरबारी दावला आरसा पदमश्रीचा जपला वारसा स्रीजातीच भूषण माई अनाथा जपण्या सदा घाई सिंधूनावाच्या सागरात जणू मोती घावले बाई माझ्या माईच्या घरात अनाथ पोराची वरात फिरली तू ग चराचरात विणवले तू प्रेम स्वरात

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड