*सखा, सहचारी, गुरु मा. प्राचार्य प्रकाश कटारिया* 30जानेवारी 2022----------------------------- आज आपला वाढदिवस या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना मला आठवतय तो चाळीस वर्षाचा सहप्रवास...! मी माझा हात आपल्या हाती सोपवताना, अनेक स्वप्न मनी ठेवून एक एक पाऊल आपल्या सोबत टाकून सप्तपदी तर पार केली. परंतु जगत असताना जीवनाची सप्तपदी पार करत असताना मला हवा असणारा मित्र, सखा, सोबती मिळाला. पती, नवरा, सहचर या ही पेक्षा वेगळं असं नातं म्हणजे मैत्रीचं...! तारुण्यातील मैत्री साठीनंतर अधिकचं अधिकच घट्ट होत जाते. म्हणतात ना "अंगूर मीठे होते है, लेकिन किस्मिस मे अधिक मिठास पैदा होती हैl"अगदी त्या प्रमाणे पती म्हणूनच नव्हे; तर तेरा बंधू, सहा भगिनी बरोबरचं प्रेम अधिकच वृंदगीत झालेलं अनुभवयाला आलं.समाजात असो, जैन विद्या प्रसारक मंडळात असो, भारतीय जैन संघटनेत असो, जैन महासंघात असो वा मी स्वानंद संस्थेत कार्य करत असो. हे सारं करताना आपले एकच वाक्य, "स्वतःसाठी तर कोणीही जगतो सुरेखा...! इतरांसाठी जगता आलं पाहिजेत. *"कर्माचं मर्म समजलं तर जगण्याचा धर्म सकारात्मक होतो. जगण्याचा हेतू उदात्त असेल, तर आपलं चित्त प्रसन्न राहील व आपला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.*" हे आपलं वाक्य जीवनात उतरवण्याचा आम्ही सर्वजण श्वेता ,निलेश ,श्रेयांस, शलाका प्रयत्न करतआलो आहोत. *सूर्याने जगाला प्रकाशाचं आंदन दिलं आणि प्रकाशा तू माझ्या जीवनात जगण्याचं कोंदण दिलं. या कोंदणात मन मोकळेपणाने मला विचार करायला प्रवृत्त केल*. तुझ्या सहवासात विचारांची तार जुळतं सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्तपणे आपले विचार व्यक्त करतो. मतभेद असतात त्या मतभेदांचा आदर ही करतो. एकमेकांना समजावून घेतो.कुणाच्या ही दुःखामध्ये सहभागी होतो. चुकलं तर बोलतो ही आणि लगेच माफ ही करतो. तो खरा सहचारी...! माझा खरा मित्र म्हणजे प्रकाशा तूच...! तू नेहमी मला म्हणतोस कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ असायला हवं. मी अनुभवलेला प्रकाश म्हणजे आपल्या मुख्य म्यानात असणारी जिभ ही जबरदस्त आहे. नेहमीच शांत डोक्याने विचार करून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचं समाधान करण्यासाठी जिभेच्या साह्याने करत असलेलं काम मला मोलाचं वाटतं. आज आपला 63 वा वाढदिवस ...!वयातील सर्व साधारणपणे 36 आकडा म्हणजे तारुण्याचा अहंकार,अहंभावाचा परंतु आपल्या जीवनात हा मला आढळलाच नाही. आणि आता तर 63 या आकड्या प्रमाणे सर्वांना जवळ घेऊन मायेची पाखर घालणारे असे सर्वांचे लाडके *व्यक्तिमत्व म्हणजे ६३ संपवून ६४ मध्ये पदार्पण करणारे माजी प्राचार्य प्राध्यापक प्रकाश कटारिया आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना आपलं आयुष्य निरोगी निरामय व आनंदाचे जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना* *आपली सखी सहचारिणी सुरेखा कटारिया रायसोनी*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड